या तारखेला रामजन्मभूमी-बाबरी वाद प्रकरणाचा ऐतिहासिक फैसला


नवी दिल्लीः आज सर्वोच्च न्यायालयात अयोध्यामधील रामजन्मभूमी-बाबरी वादाप्रकरणी युक्तीवाद पूर्ण झाला असून याप्रकरणी निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला असून येत्या १७ नोव्हेंबरला तो ऐतिहासिक फैसला सुनावण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज तासभर आधीच या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात आल्यानंतर १७ नोव्हेंबरला फैसला सुनावण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.

आज बुधवारी अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण करण्यात आली. यासंबंधीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला असून यावर फैसला सुनावला जाणार आहे. आज सुमारे चारच्या सुमारास म्हणजेच तासभर आधीच या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात आली. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणावर लागोपाठ ४० दिवस सुनावणी पूर्ण करण्यात आली. या प्रकरणावर पाच सदस्यीय संविधानिक खंडपीठाने सुनावणी पूर्ण केली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आज सुनावणी सुरू होताच स्पष्ट केले की, या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. पण तासभर आधीच आजची सुनावणी वेळेच्या पूर्ण करण्यात आली.

मुस्लीम आणि हिंदू पक्षकाराने आजच्या सुनावणीत आपापली बाजू सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली. आज सुनावणीदरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा सुद्धा पाहायला मिळाला. हिंदू महासभेच्या वकिलाकडून सादर करण्यात आलेला नकाशा मुस्लीम पक्षकाराचे वकील राजीव धवन यांनी सरन्यायाधीश यांच्यासमोर फाडून टाकला. सरन्यायाधीशांनी वकिलाच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली. याआधी मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्व पक्षकारांना १६ ऑक्टोबर पर्यंत यासंबंधीचे पुरावे सादर करण्याचे निर्देश सरन्यायाधीश यांनी दिले होते. चार आठवड्याचा कालावधी या प्रकरणावर फैसला सुनावण्यासाठी लागणार असल्याने बुधवारी पक्षकारांनी आपापले पुरावे सादर करावे, असे सरन्यायाधीश यांनी आधीच नमूद केले होते.

अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वकिलाच्या युक्तीवादावर मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी नाराजी व्यक्ती केली. याप्रकरणी जर असाच युक्तीवाद सुरू राहिल्यास आम्ही उठून जाऊ, असे त्यांनी म्हटले. हिंदू महासभेच्या वकिलाने मुख्य न्यायाधीशांच्या नाराजीनंतर दिलगिरी व्यक्त करीत मी न्यायालयाचा सन्मान करतो. न्यायालयाच्या शिष्टाचाराचे मी उल्लंघन केले नसल्याचे न्यायालयात म्हटले. त्यानंतर ऑक्सफोर्डमधील एका पुस्तकाचा संदर्भ दिला. यावर आक्षेप घेत मुस्लीम पक्षकाराचे वकील राजीव धवन यांनी हा नकाशा फाडून टाकला. वकिलाच्या या कृतीवर मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Leave a Comment