या कारणामुळे भारतात लाँच होणार नाही गुगलचा हा स्मार्टफोन

गुगलने न्युयॉर्कमध्ये आयोजित मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये गुगल पिक्सल 4 आणि पिक्सल 4 एक्सएल हे स्मार्टफोन्स लाँच केले. या दोन्ही फोनमध्ये रडार सेंसर देण्यात आले आहे व याच फिचरमुळे भारतीय बाजारात गुगलचे हे दोन स्मार्टफोन लाँच होऊ शकणार नाहीत.

पिक्सल 4 आणि पिक्सल 4 एक्सएल हे स्मार्टफोन प्रोजेक्ट सोली अंतर्गत लाँच करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही फोनमध्ये रडार देण्यात आले आहे. याच्या मदतीने फोन इशाऱ्याने देखील काम करेल. उदाहरणार्थ तुम्ही पिक्सल 4 फोनला केवळ इशारा देऊन गाणे बदलू शकता.

रडारमुळे हा फोन भारतात लाँच होणार नाही. पिक्सल 4 मध्ये जे रडार सेंसर देण्यात आलेले आहे. त्यासाठी 60 एचझेड फ्रिक्वेंसीची गरज असते. अनेक देशात या फ्रिक्वेंसीसाठी लायसन्सची गरज पडत नाही. मात्र भारतात याचे लायसन्स घ्यावे लागते. त्यामुळे सांगण्यात येत आहे की, गुगल पिक्सल 4 आणि पिक्सल 4 एक्सएल हे फोन भारतीय बाजारात लाँच होणार नाही.

या स्मार्टफोनमधील रडारद्वारे फोनला टच देखील न करता अनेक काम केले जाऊ शकतात. केवळ वरून हात फिरवून गाणी बदलता येऊ शकतात. समजा, फोनची रिंग वाजत आहे. अशावेळी तुम्ही फोनच्या जवळ गेल्यास फोन आपोआप नॉर्मल होईल.

 

Leave a Comment