‘रोटी घर’ गरिबांना देते १ रुपयात पोटभर अन्न


कर्नाटकमधील हुबळी येथील गरिब, भिकारी आणि कामगारांसाठी एक रुपया खूपच मोलाचा झाला असून या एक रुपयात ते येथील ‘रोटी घर’मधील कँटीनमध्ये पोटभर अन्न जेवू शकतात.

कर्नाटकमधील हुबळी येथे महावीर युथ फेडरेशनने गेल्या सहा वर्षांपासून गरीबांना पोटभर आणि सकस अन्न मिळावे यासाठी नवीन उपक्रम हाती घेतला आहे. ते येथील गरीबांना १ रुपयांत पोटभर अन्न देत आहे. येथे अनेक लोक गेल्या सहा वर्षांपासून जेवत आहेत. ऑफिसला जाणारे कर्मचाऱ्यांपासून कामगार, गरिब असे अनेक जण रोटी घरमध्ये जेवतात. एक रुपयात दाळ, भात, चपाती, भाजी येथे मिळते. सणाच्या दिवसात कधी कधी गोडाचा पदार्थही दिला जातो.

यापूर्वी गरिबांसाठी महावीर युथ फेडरेशनने मोफत रुग्णालय सुरु केले होते. पण डॉक्टर नसल्याने त्यांना आपला हा उपक्रम मध्येच बंद करावा लागला. पण त्यांच्या रोटी घरला मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. तामिळनाडूमध्ये स्वर्गीय जयललिता यांनी गरीबांना कमी दरात आहार मिळावा यासाठी अम्मा कँटीन सुरु केले होते. येथे १ रुपयांपासून ते ५ रुपयांपर्यंत इडली, सांबार, भात मिळत असे.

Leave a Comment