गुगलची खास फिचर्सची पिक्सल ४ सिरीज लाँच


गुगलने त्यांच्या ‘मेड बाय गुगल’ इव्हेंटमध्ये बहुप्रतीक्षित गुगल पिक्सल फोर सिरीज लाँच केली. न्युयॉर्क मध्ये तेथील वेळेनुसार सकाळी १०.३० वा. हा इव्हेंट सुरु झाला. जगभरातील गुगल चाहते या सिरीजची प्रतीक्षा करत होते आणि या फोनचे अनेक लिक समोर आले होते. जस्ट ब्लॅक, क्लिअरली व्हाईट आणि ओहसो ऑरेंज अश्या तीन रंगात हा फोन उपलब्ध होत असून पैकी ऑरेंज रंगाचा फोन लिमिटेड एडीशन आहे.

पिक्सल ४ स्मार्टफोन दुनियेत सर्वाधिक तेज फेस अनलॉक फिचर असलेला फोन असल्याचा दावा केला जात आहे. हा फोन हातात घेण्यापूर्वीच त्याचे फेस अनलॉक फिचर अॅक्टीव्हेट होते. रडार सेन्सर फिचर असलेला हा पहिलाच फोन आहे. त्यासाठी Soli मोशन सेन्सिंग रडार दिले गेले असून कंपनी बराच काळ या तंत्रज्ञानावर काम करत होती असे सांगितले जात आहे.

या तंत्रज्ञानामुळे फोनचा आसपास होत असलेल्या हालचाली नोंदल्या जातात. मोशन सेन्सिंग रडार हाताचे जेश्चर रेडिओ लहरीच्या सहाय्याने कॅच करतो आणि युजर त्यामुळे फोनला स्पर्शही न करता फोन वापरू शकतो. गुगलने या इव्हेंट मध्ये सादर केलेले पिक्सल ४ आणि पिक्सल ४ एक्सएल या दोन्हीसाठी ९० एचझेड रिफ्रेश रेट स्क्रीन दिला गेला आहे. पिक्सल चार साठी ५.७ इंची ओलेड डिस्प्ले असून नवीन कम्प्युटेशनल फोटो फिचर दिले गेले आहे. नाईट साईट मोडही पूर्वीपेक्षा अधिक सरस आहे.

या फोन मध्ये पिक्सल चार कॅमेऱ्याचे हार्डवेअर वापरले गेले आहे. १२ एमपीचा प्रायमरी सेन्सर,शिवाय १२ एमपी व १६ एमपीचे सेन्सर ड्युअल पिक्सल ऑटो फोकससह दिले गेले आहेत. स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर, ६ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी अशी याची अन्य फिचर्स असून फोनची किंमत ७९९ डॉलर्स म्हणजे ५७ हजार रुपये आहे. ४ एक्सएल साठी ६.३ इंची स्क्रीन असून त्याची किंमत ८९९ डॉलर्स म्हणजे ६४ हजार रुपये आहे. हे दोन्ही फोन अमेरिकेत प्रीबुकिंग साठी उपलब्ध करून दिले गेले आहेत.

Leave a Comment