हिवाळ्यात या पाच ठिकाणांना नक्की भेट द्या

फिरायला कोणाला आवडत नाही. मस्त एखाद्या समुद्रावर, बर्फाळ प्रदेशात थंडीच्या ठिकाणी जायला प्रत्येकालाच आवडत असते. दिवाळीच्या सुट्टीमध्ये अथवा नवीन वर्षाला जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी अशीच काही पाच ठिकाण घेऊन आलो आहोत. या ठिकाणी तुम्ही अगदी निवांतपणे तुमच्या हिवाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.

(Source)

केरळ –

केरळमध्ये नैसर्गिक सौंदर्याचा जणूकाही वर्षावच झालेला आहे. येथील पश्चिमी घाट आणि समुद्र किनारे केरळच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकतात. जर तुम्ही येथे गेला तर कोवलम आणि वर्कला बीचला नक्की जा. येथे मसाल्यांच्या अनेक बागा आहेत, ज्या खूपच सुंदर आहेत. मुन्नारच्या चहाच्या बागा देखील प्रसिध्द आहेत.

(Source)

राजस्थान –

राजस्थानला राजवाडे आणि राजा महाराजांची भूमी म्हणणे चुकीचे ठरणार नाही. येथे तुम्हाला अनेक पारंपारिक आणि ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळतील. येथे भानगढ किल्ला हा भितीदायक ठिकाणांपैकी एक आहे.

(Source)

उदयपूर –

उदयपूरला पुर्वेचे वेनिस म्हटले जाते. हे झऱ्यांचे शहर आहे. हे भारतातील सर्वात रोमँटिक शहरा पैकी देखील एक आहे. हिवाळ्यामध्ये पर्यटक येथे बोटिंग आणि साइट सीइंगचा देखील आनंद घेतात. येथील झरे आणि पर्वत संध्याकाळच्या वेळी बघणे एक सुखःद अनुभव असतो.

(Source)

काश्मिर –

काश्मिर हा पृथ्वीवरील स्वर्ग आहे असे म्हटले जाते. काश्मिरमधील गुलमर्ग, पटनीटॉप, सोनमर्ग, पहलगाम आणि डल झरे हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. येथील हाउस बोट देखील लोकप्रिय आहे. सफरचंदाच्या बागा पर्यटकांचे ध्यान आकर्षित करतात.

(Source)

पुद्दुचेरी –

जर तुम्हाला भारतात राहून फ्रांसचा प्रवास करायचा असेल तर हिवाळ्यामध्ये पुद्दचेरीला नक्की भेट द्या. येथे अनेक फ्रेंच कॉलनी आहेत. डिसेंबरमध्ये येथील वातावरण खूपच सुंदर असते. तुम्ही येथे नवीन वर्ष देखील साजरे करू शकता.

Leave a Comment