रिअलमीचा एक्स2 प्रो हा दमदार स्मार्टफोन बाजारात दाखल

रिअलमीने आपला नवीन स्मार्टफोन रिअलमी एक्स 2 प्रो चीनमध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये लाँच केला आहे. हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आलेला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.5 फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच आणि गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आलेले आहे. डिस्ल्पेमध्ये एचडीआर10+ आणि डीसीआय-पी3 कलर स्पेस देखील सपोर्ट करते.

(Source)

रिअलमी एक्स2 प्रोमध्ये स्नॅपड्रॅगन 855+ अँड्रेनो 640 जीपीयू प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 6 जीबी, 8 जीबी आणि 12 जीबी रॅमसोबत 256 इंटर्नल स्टोरेज अशा तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यामध्ये 64 मेगापिक्सल सॅमसंग जीडब्ल्यू प्रायमेरी सेंसर रिअर कॅमेरा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 13 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सल मायक्रो लेंस कॅमेरा देखील आहे. याशिवाय 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील मिळेल.

(Source)

रिअलमी एक्स 2 मध्ये 4,000mAh बॅटरी देण्यात आली असून, 50W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. 30 मिनिटांमध्ये बॅटरी 80 टक्के चार्ज होईल. हा स्मार्टफोन ओशन ब्ल्यू आणि मिडनाईट सिल्वर या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

(Source)

किंमतीबद्दल सांगायचे तर 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 2599 युआन (26000 रूपये) आहे. तर 8 जीबी +126 जीबी व्हेरिंएटची किंमत 2,799 (28,000 रूपये) आणि 12 जीबी + 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 3,999 युआन (32,000 रूपये) आहे.

Leave a Comment