नोबेल विजेते बॅनर्जींना यामुळे 10 दिवस राहावे लागले होते जेलमध्ये

यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मुळ भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांना मिळाला. बॅनर्जी यांना लहानपणापासूनच गरीबीबद्दल काळजी वाटत असे. याबद्दल ते लहानपणी आपले अर्थशास्त्रज्ञ वडिल डॉ. दीपक बॅनर्जी आणि डॉ. निर्मला यांना देखील प्रश्न विचारत असे. 1983 मध्ये जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी (जेएनयू) मधून एमए केल्यानंतर 1988 मध्ये त्यांनी हॉवर्डमधून पीएचडी केली.

अभिजित यांनी फेब्रुवारी 2016 मध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये सांगितले होते की, त्यांना तिहार जेलमध्ये देखील राहावे लागले होते. त्यांनी सांगितले की, 1983 मध्ये आम्ही जेएनयुच्या विद्यार्थ्यांनी मिळून व्हाईस चांसलरच्या विरोधात आंदोलन केले होते. ते विद्यार्थ्यांच्या अध्यक्षाला कँपसमधून निलंबित करणार होते. त्यावेळी देशात काँग्रेसचे सरकार होते. पोलिस शेकडो विद्यार्थ्यांना उचलून घेऊन गेले. त्यांना 10 दिवस तिहारच्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्यावेळी राजद्रोह सारखा ठपका आमच्यावर ठेवण्यात आला नाही. हत्येचा प्रयत्न केला असल्याच्या आरोपाखाली 10 दिवस जेलमध्ये राहावे लागले होते.

(Source)

अभिजीत बॅनर्जी सध्या मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर आहेत. त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने जेएनयूच्या शिक्षकांनी देखील आम्हाला अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे.

एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये गरिबीविषयी मत मांडताना बॅनर्जी म्हणाले की, सरकार गरीबांना पैसे देऊ शकते व चांगल्याप्रकारे अर्थव्यवस्था देखील चालवली जाऊ शकते. यामध्ये कोणताही विरोधाभास नाही.

(Source)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने न्याय स्कीम आणणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले होते. या योजनेचे देखील बॅनर्जी यांनी कौतूक केले. ते म्हणाले की, बेसिक उत्पन्नाविषयी निश्चितच विचार करायला हवा. अनेक लोक असे आहेत, जे अडचणीमुळे सर्वकाही गमावून बसतात. अनेकवेळा खूप पाऊस पडतो, तर काही ठिकाणी पाऊसच पडत नाही. रिअल इस्टेटमध्ये देखील मोठे नुकसान होते, तर बँका देखील बंद होतात. या सर्व अडचणीतून लोकांना वाचवले पाहिजे.

आजच्या मार्केटवर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये अचानक लोकांची नोकरी जाते, अशावेळी त्यांना आर्थिक सुरक्षा दिली पाहिजे, असे मत देखील त्यांनी मांडले.

(Source)

जेएनयूविषयी ते म्हणाले की, मी कोलकातामध्ये राहत असल्याने केवळ डाव्यांचेच राजकारण मला माहित होते. मात्र जेएनयूमध्ये आल्यानंतर लोहिया, गांधी आणि संघाचे विचार देखील समजले. या संघटनांशी मी जोडलेले नसलो तरी भारतीय राजकारणाची मला त्यावेळी चांगली माहिती मिळाली.

Leave a Comment