‘चंपा’ची मनसेचा उमेदवार जोरदार चंपी करणार – राज ठाकरे


पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील प्रचारसभेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ‘चंपा’ची मनसेचा उमेदवार चंपी करणार असे ते म्हणाले. राज ठाकरे यांची सभा पुण्यातील मंडईमध्ये आयोजित करण्यात आली होती.

पुण्याबरोबर राज्यातील पुरावर भाष्य करताना राज्यात एवढा पूर आला की, कोल्हापूरचा एक मंत्री वाहत पुण्यात आला, अशी टीका राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता केली. यंदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असल्याने बाहेरचा उमेदवार कोथरूडकरांवर लादल्याची टीका करण्यात येत होती. कोथरूडमधून किशोर शिंदे यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने देखील या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारासाठी राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात केली होती. त्यांनी त्यावेळी भाजपचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली. शिवसेना म्हणजे लाचार, भाजपसोबत इतकी वर्षे सडली आणि १२४ वर अडली, बाळासाहेब असते तर अशी वेळ आली नसती, असेही ते म्हणाले.

Leave a Comment