बाबा होणार आहे कपिल शर्मा


लवकरच कॉमेडीचा बादशहा कपिल शर्माच्या घरी चिमुकल्याचे आगमन होणार आहे. सध्या मनोरंजन विश्वात कपिल बाबा होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. नुकताच पत्नी गिन्नीचा ‘बेबी शॉवर’चा फोटो कपिलने सोशल मीडियावर शेअर केला. त्याच्यावर कपिलच्या जगभरातल्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. कपिल आणि गिन्नी गेल्यावर्षी डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते.

काही दिवसांपूर्वी कपिलने गिन्नी गर्भवती असल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला होता. गेल्या काही महिन्यांपासून कपिलची आईसुद्धा त्यांच्यासोबत राहायला आली आहे. सध्या कपिल त्याच्या द कपिल शर्मा शोमध्ये व्यस्त असतो. पण या शोमधून वेळात वेळ काढून लवकर घरी जाण्यास कपिल सध्या प्राधान्य देत आहे. कपिलने डिसेंबर २०१८ मध्ये गिन्नी सोबत लग्न केले. पंजाब येथील जालंधरमध्ये महाविद्यालयीन प्रशिक्षण घेत असताना गिन्नी आणि कपिलची भेट झाली. २०१७ मध्ये त्याने गिन्नीसोबतचा फोटो ट्विट करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

Leave a Comment