साहाच्या अफलातून कामगिरीनंतर नेटकऱ्यांनी ऋषभ पंतवर शेअर केले मिम्स

पुण्यात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 137 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. घरच्या मैदानावर भारताचा हा सलग 11 वा मालिका विजय आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात विकेटकिपर वृध्दीमान साहाने स्टम्प्स मागील आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले. साहाने स्टम्प्स मागे अफलातून कॅच पकडत शानदार कामगिरी केली.

काही दिवसांपुर्वीच कर्णधार विराट कोहलीने वृध्दीमान साहा हा जगातील सर्वोत्तम किपर असल्याचे म्हटले होते. कोहलीचा हाच विश्वास साहाने सार्थक ठरवत दुसऱ्या कसोटीत अफलातून कामगिरी केली.

वृध्दीमान साहाच्या कामगिरीमुळे ऋषभ पंतची चिंता मात्र वाढली आहे. एकीकडे संजू सॅमसनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये दुहेरी शतक ठोकत निवड समितीचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे तर वृध्दीमान साहा कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करत आहे. ऋषभ पंत मात्र विशेष अशी कामगिरी करण्यास अपयशी ठरत आहे.

वृध्दीमान साहाच्या अफलातून कामगिरीनंतर नेटकऱ्यांनी मात्र ऋषभ पंतवर मिम्स शेअर करण्यास सुरूवात केली.

नेटकऱ्यांनी एकप्रकारे ऋषभ पंतच्या विकेटकिपिंगची खिल्लीच उडवली.

Leave a Comment