हवा शुध्दीकरणासाठी या ठिकाणी बनवणार फ्युरीफायर टॉवर

वायू प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनप्रमाणे सुरतमध्ये देखील एअर फ्यूरीफायर टॉवर लावण्यात येणार आहे. क्लीन एनवायरमेंट रिसर्च सेंटर (सीआयआरसी), आयआयटी दिल्ली आणि एसवीएनआयटी एअर फ्यूरीफायर लावणार आहे. 500 मीटर जागेत 10 मीटर रूंद आणि 24 मीटर उंच हा टॉवर असेल. यामध्ये 25 हॉर्स पॉवरची मशीन बसवण्यात येईल. याद्वार प्रतीदिन 30,000 क्यूबिक मीटर हवा शुध्द होईल. यामुळे 1 लाख लोकांना शुध्द हवा मिळेल.

या संबंधी एका वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात गुजरात टेक्सटाइल प्रोसेसिंग असोसिएशनला एअर फ्यूरीफायरचे फायदे, लावण्याचा खर्च आणि तंत्र याबाबत माहिती देण्यात आली.

हे एअर फ्यूरीफायर आपल्या आजूबाजूची प्रदुषित हवा शुध्द करेल. सर्वात छोटा टॉवर बनवण्यासाठी 1.5 कोटी रूपये खर्च येईल. एसवीएनआयटीचे प्रोफेसर आणि क्लीन एनवायरमेंट रिसर्च सेंटरचे वैज्ञानिक डॉ. आरए ख्रिश्चियन यांनी सांगितले की, चीन आणि आपल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये फरक आहे. आयआयटी दिल्लीचे प्रोफेसर मुकेश खरे आणि त्यांच्या टीमने चीनच्या एअर फ्यूरीफायर टॉवरची पाहणी केलेली आहे. हा टॉवर बनवणाऱ्या युनिवर्सिटी ऑफ मिनेसोटाचे प्रोफेसर डॉ. डेव्हिड पुई यांच्या देखील संपर्कात आहे. पुढील काही दिवसांमध्ये त्यांना सुरतमध्ये बोलवले जाणार आहे.

सुरतमध्ये बनवण्यात येणाऱ्या एअर फ्युरीफायर टॉवरला हवामान विभागाशी देखील जोडले जाणार आहे. यामुळे हवा आणि वातावरणातील बदलातील योग्य डेटा मिळू शकेल. दिवस हे चालण्यासाठी सोलर पॅनेल देखील लावले जाणार आहेत. हा टॉवर लावण्यासाठी अद्याप जागा निश्चित करण्यात आलेली नाही. मोबाईल व्हॅनमध्ये देखील छोटा एअर फ्यूरीफायर टॉवर लावण्याची योजना आहे. ज्यामुळे ठिकठिकाणी जाऊन हवा साफ करता येईल. एअर फ्यूरीफायर प्रदुषित हवा आपल्याकडे खेचेल व त्यानंतर त्याला टॉवरमध्ये गरम केले जाईल व वेगवेगळ्या स्तरांवर फिल्टर करून पास केले जाईल.

Leave a Comment