या राज्यातील ट्रॅफिक पोलिस दीड लाख ई-चलान घेणार मागे

दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी दीड लाख ई-चलान परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातील अधिकतर चलान हे राष्ट्रीय महामार्गावर 24 ऑगस्ट ते 10 ऑक्टोंबर या काळातील आहे. जमा केलेल्या रक्कमेचे काय होणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

ट्रॅफिक पोलिसांना हे चलान परत का घ्यावे लागले असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याचे कारण देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडब्ल्यूडी विभागाने ताशी 70 किमी वेग असावा असा साइनबोर्ड लावला होता. मात्र महामार्गावर ताशी 60 किमी वेगाने गाडी चालवणाऱ्यांचे चलान कापण्यात आले. अनेक तक्रारी आल्यानंतर हे सर्व ई-चलान मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पीडब्ल्यूडीला साइनबोर्ड बदलून ताशी 60 किमी करण्यास सांगण्यात आला, मात्र त्यांना बोर्ड बदलला नाही. अखेर आता कॅमेऱ्याची उच्च गती सीमा ताशी 70 किमी करण्यात आलेली आहे.

ई-चलान कापल्यावर जमा करण्यात आलेल्या दंडाचे काय करणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

याशिवाय काही चालकांना त्यांची काहीही चुकी नसताना चलान कापले आहे असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या कारणामुळे देखील ई-चलान परत घेण्यात आले असण्याची शक्यता आहे.

 

Leave a Comment