खेळाडूने विकेट घेतल्यानंतर दाखवला ‘बाबाजी का ठुल्लू’, कपिल शर्माने दिले असे रिएक्शन

वेस्ट इंडिजचे खेळाडू विकेट घेतल्यानंतर आणि विजयानंतर आपल्या हटके स्टाईलमध्ये डान्स करत सेलिब्रेशन करत असतात. वेस्ट इंडिजचा स्पिनर एश्ले नर्सने देखील विकेट घेतल्यानंतर हटके स्टाईलने सेलिब्रेशन केले. विकेट घेतल्यानंतर एश्लेने कॉमेडियन कपिल शर्माप्रमाणे ‘बाबाजी का ठुल्लू’ दाखवला. एश्लेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वतः कपिल शर्माने देखील यावर रिएक्शन दिले.

https://twitter.com/Hassam_gt/status/1183311925242933248

12 ऑक्टोंबरला कॅरेबियन प्रिमियर लीगचा अंतिम सामना गयाना अॅमेझॉन वॉरियर्स आणि बारबाडोज ट्राइडेंट्स यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यात बारबाडोजच्या संघाने 27 धावांनी विजय मिळवला.

बारबाडोजच्या संघाकडून खेळताना एश्लेने 4 ओव्हरमध्ये 2 महत्त्वपुर्ण विकेट्स घेतले. याचबरोबर त्याने 15 चेंडूमध्ये 19 धावा देखील केल्या. त्याने विरूध्द संघातील ब्रँडन किंग आणि निकोलस पूरन यांच्या विकेट्स घेतल्या. त्यांना आउट केल्यानंतर एश्लेने ‘बाबाजी का ठुल्लू’ दाखवत सेलिब्रशन केले. हा व्हिडीओ बघून कपिल शर्माला देखील हसायला आले.

 

Leave a Comment