एअर इंडिया ठरली विमानाला ‘टॅक्सीबॉट’द्वारे रनवेवर आणणारी पहिली कंपनी

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एअर इंडियाने एक नवीन कामगिरी केली आहे. प्रवाशांनी भरलेल्या ए-320 विमानाच्या कमर्शियल फ्लाइटसाठी टॅक्सीबॉटचा वापर करणारी एअर इंडिया जगातील पहिली एअरलाइन कंपनी ठरली आहे.

टॅक्सीबॉट काय आहे ?

टॅक्सीबॉटला टॅक्सिंग रोबॉट देखील म्हटले जाते. याचा वापर विमानाला पार्किंग बे पासून रनवे पर्यंत ओढून आणण्यासाठी केला जातो. जेव्हा विमान पार्किंग बे पासून रनवेपर्यंत खेचून आणण्यात येते त्यावेळी त्याचे इंजिन बंद असते. यामुळे 85 टक्के इंधनाची बचत होते. हे सेमी-रोबोटिक टो-बार असते. याचा वापर केवळ डिपार्टिंग फ्लाइटसाठी केला जातो.

एअर इंडिया सध्या आर्थिक संकटांचा सामना करत असून, तेल कंपन्यांची थकबाकी देखील आहे. लवकरच यातून काहीतरी मार्ग निघणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Leave a Comment