या कारणामुळे सुरत विमानतळावर दर दिवशी 150 वेळा करावा लागतो गोळीबार

गुजरातमधील सुरत विमानतळाजवळ तलाव असल्याने विमानांना पक्षी धडकण्याचा धोका असतो. येथे हजारोंच्या संख्येत पक्षी येत असतात. ज्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. विमानतळ अथॉरिटीने या बर्ड हिटपासून वाचण्यासाठी जोन गन्सचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंग आधी प्रत्येक वेळी जोन गन्सची फायरिंग करावी लागते. यामुळे पक्षी उडून जातात. दर दिवशी अशाप्रकारे 150 वेळा फायरिंग करावी लागते.

विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरत विमानतळाजवळ अनेक तलाव आहेत. त्यामुळे पक्षी मोठ्या संख्येने या भागात असतात. याबाबत कलेक्टरांना देखील माहिती देण्यात आलेली आहे.

ज्या दिशेला पक्षी अधिक दिसतात त्या दिशेने फायरिंग केले जाते. दर मिनिटाला फायरिंग करावी लागते. सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 11.30 पर्यंत 80 वेळा फायरिंग करावी लागते. तर दुपारी 3 पासून ते 7.30 पर्यंत 60-70  वेळा फायरिंग करावी लागते.

2017 पासून विमानतळावरून उड्डाण संख्या वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे पक्ष्यांचा धोका अधिक आहे. त्यामुळे यापासून सुटका मिळवण्यासाठी जोन गन्सचा वापर करण्यात येत आहे. विमानतळाच्या दोन्ही बाजूला 5 बंदूका लावण्यात आलेल्या आहेत. या पाच बंदुकींची किंमत 4 लाख रूपये आहे. यातील एक एक्विपमेंट बंदुकीची किंमत 80 हजार रूपये आहे. यांना सिलेंडरद्वारे चालवले जाते. एक सिलेंडर 20 दिवस जातो. या कामात दर महिन्याला 7 हजार रूपये खर्च होतात. मेंटनेस जोडला तर हा खर्च 10 हजारांच्या पुढे आहे.

Leave a Comment