टेक्नो कॅमन १२ एअर – पंचहोल डिस्प्लेचा स्वस्त स्मार्टफोन


टेक्नो कॅमन १२ एअर हा पंचहोल डिस्प्ले कॅमेरा असलेला स्मार्टफोन कंपनीने डॉट इन डिस्प्ले नावाने भारतीय बाजारात आणला आहे. ऑफमार्केट बाजारातील या प्रकारचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा केला आहे. या फोनला ट्रिपल कॅमेरा सेटअप, मिडिया टेक हिलिओ पी २२ एसओसी सह दिला गेला आहे. भारतीय बाजारात तो ९९९९ रुपयात उपलब्ध करून दिला गेला आहे. ब्ल्यू आणि स्टेलर पर्पल कलरमध्ये तो मिळेल.

भारतात फेस्टीव्ह सिझन लक्षात घेऊन १० हजारापेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोन सेगमेंट मध्ये टॉप पाच मध्ये सामील होण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. या फोनला ६.६५ इंची एचडी प्लस डिस्प्ले, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज, ४ हजार एमएच बॅटरी अशी फिचर्स असून तो अँड्राईड १० वर रन होतो. फोनसाठी १६ एमपीचा प्रायमरी सेन्सर शिवाय २ एमपीचा कॅमेरा आणि सेल्फीसाठी ८ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. हा फोर जी फोन आहे.

Leave a Comment