मायक्रोसॉफ्टच्या पॉल अॅलनच्या अलिशान याटची विक्री, किंमत २३०७ कोटी


मायक्रोसॉफ्टचा सहसंस्थापक पॉल अॅलन याचा गतवर्षी ऑक्टोबर मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अनेक मौल्यवान वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. त्यात त्याच्या ४१४ फुट लांबीच्या सुपरयाटचा समावेश असून या याचसाठी २३०७ कोटी म्हणजे ३२.५ कोटी डॉलर्स किंमत अपेक्षित आहे. ऑक्टोपस असे या याटचे नाव असून पॉल अॅलनच्या मालकीच्या तीन अलिशान याट पैकी ती एक आहे. या याटला ८ डेक, एक लिफ्ट, दोन हेलीपॅड, सिनेमा हॉल, ग्लास बॉटम अंडरवॉटर ऑब्झर्व्हेशन लाउंज अश्या अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. पॉल अॅलन याने ही याट बनविण्यासाठी १४२० कोटी खर्च केला होता आणि २००३ साठी ती बनून तयार झाली होती.

या सुपरयाट शिवाय पॉल अॅलन याच्या मालकीच्या ३०१ फुटी टॅट्यूरा आणि १९८ फुटी मेदुसा अश्या आणखी दोन याट आहेत. ऑक्टोपस केवळ अलिशान याट नाही तर तिचा वापर रिसर्च ट्रीप, रेस्क्यू मिशन साठीही केला गेला आहे. या याटवर २६ पाहुणे आणि ६३ क्रू मेंबर यांची व्यवस्था आहे. समुद्रातील हिमनग फोडून सुद्धा ही याट तिची मार्गक्रमणा करू शकते. पॉल अॅलन याच्या मालकीच्या अन्य मालमत्तेची विक्रीही केली जात आहे. त्यात १.१० कोटी डॉलर्स किमतीचे बेवर्ली हिल्स मधील घर, एक मिग २९ फायटर जेट, यांचा समावेश आहे. पॉल अॅलन यांच्या स्टॅटोलाँच एरोस्पेस कंपनीने जगातील सर्वात मोठे विमान बनविले आहे. पॉल अॅलन यांची मृत्युसमयी एकूण मालमत्ता २०३० कोटी डॉलर्स होती असे समजते.

Leave a Comment