जिओकडून एआय आधारित व्हिडीओ असिस्टन्स सेवा सादर


रिलायंस जिओने जगातील पहिली एआय आधारित व्हिडीओ कॉल असिस्टन्स सेवा बॉट नावाने दिल्ली येथे सुरु असलेल्या इंडिया मोबाईल कॉंग्रेस मध्ये सादर केली आहे. जगातील या प्रकारची ही पहिलीच सेवा असल्याचा दावा रिलायंस जिओने केला असून या सेवेसाठी कोणतेही अन्य अॅप इन्स्टॉल करण्याची गरज नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही सेवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करते. या सेवेमुळे कस्टमर सपोर्ट व कस्टमर कम्युनिकेशन मध्ये मोठी क्रांती होईल असा दावा जिओने केला आहे.

या सेवेमुळे युजरची कस्टमर सपोर्ट मध्ये कॉल होल्ड करणे व आयव्हीआर वेट पासून सुटका होणार आहे. हा व्हिडीओ कॉल असिस्टंट एआय वापरून कस्टमर प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल कारण त्यात ऑटो लर्निंग फिचर सुविधा दिली गेली आहे. त्यामुळे उत्तरे अचूक देणे शक्य होणार आहे. ही व्हिडीओ असिस्टंट सोल्युशन सेवा अमेरिकन कंपनी रेडीसस सह विकसित केली गेली आहे कारण ही कंपनी रिलायंस इंडस्ट्रीज प्रायवेट लिमिटेडची सहाय्यक कंपनी आहे.

Leave a Comment