इथिओपिया, ऐतिहासिक स्मारके आणि निसर्गसुंदर स्थळांनी नटलेला देश


यंदाचे शांततेसाठीचे नोबेल इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली याना जाहीर झाले आणि आफ्रिकेतील हा देश एकदम चर्चेत आला. पर्यटनाच्या दृष्टीने हा देश फारसा प्रसिद्ध नाही मात्र या अनेक ऐतिहासिक स्मारके, युनेस्कोच्या जगातील वारसा यादीतील स्थळे आणि निसर्गसौंदर्य पाहायचे असेल तर या देशाला भेट देण्याचा विचार नक्कीच करायला हवा.


या देशाची राजधानी अदिसअबाबा हे येथील मोठे शहर. शहरात अनेक सुंदर वास्तू आहेत तसेच येथून १०० किमीवर असलेले लेक जीवे हे गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर अनेक वन्य जीवांचे माहेरघर आहे. येथे विविध प्रकारचे घोडे आढळतात. ओमो व्हॅली हा भाग अनेक जातीजमातींच्या आदिवासी वस्तीचा भाग आहे. येथे त्यांची परंपरागत घरे, वस्त्या, त्यांचे रितीरिवाज पाहायला मिळतात. कोन्सो व फिजेस पेलीयोन्टॉजिकल रिसर्च सेंटर लोकेशन अशीच पाहण्यालायक असून येथे मानवी विकास कसा होत गेला हे दर्शविणारी दगडी उपकरणे, जीवाश्म आहेत. हे स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहे.


याच यादीत उत्तर इथिओपिया मधले लालीबेलाचे रॉक हेवन चर्च असून खडक फोडून ११ चर्च बांधली गेली आहेत. तसेच लोअर अवस् नावाची महत्वाची व्हॅलीही आवर्जून भेट द्यावी अशी. येथे ४० लाख वर्षे जुने पाषण आढळले आहेत.एक्सम ही येथील सर्वात मोठी ऐतिहासिक साईट असून महान प्राचीन सभ्यतेचे केंद्र म्हणून तिची ओळख आहे. रुढीवादी ख्रिश्चन लोकांसाठी हे पवित्र स्थळ आहे.


ब्ल्यू नाईल नदीवरचा धबधबा असाच सुंदर आहे. त्याला स्थानिक भाषेत टीस अबे म्हणजे धुंवाधार पाणी असे म्हणतात. जगातील सुंदर धबधब्यापैकी हा एक आहे.


गोंडरचा प्राचीन किल्ल्याचे अवशेष गोंडर येथे पाहायला मिळतात. १७ व्या १८ व्या शतकात सम्राट फॅसीलीडस याने त्याला राहण्यासाठी हा किल्ला बांधला होता. न्युबियान अम्हार भागात सिमीयन माउंटन नॅशनल पार्क असून येथे पहाडी बकऱ्या पाहायला मिळतात. या बकऱ्या जगातून नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.

Leave a Comment