संशोधकांचा खुलासा, या कारणामुळे खोट बोलतात लोक

एका नवीन अभ्यासानुसार, संशोधकांनी दावा केला आहे की घरी अथवा ऑफिसमध्ये ज्या व्यक्तींवर काम करण्याचा दबाव असतो, अशी लोक अधिक खोट बोलण्याची शक्यता असते. दबावामुळे ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवता अथवा सत्य बोलण्याची अपेक्षा करता असे लोक देखील खोट बोलू शकतात.

कॅलिफोर्निया युनिवर्सिटी सांता बारबराचे (यूसीएसबी) वैज्ञानिक जॉन प्रोटोज्को यांनी सांगितले की, आपण घाईघाईत प्रश्न समजून न घेता उत्तर देतो. असे का झाले याबाबत आपण विचारच करत नाही. लोकांना माहिती तर आहे की, ते खोट बोलत आहेत मात्र समोरच्याला जे ऐकायचे आहे तेच आपण बोलतो. जर सत्य सांगितले तर समोरच्या व्यक्तीकडून वाईट प्रतिक्रिया येऊ शकते व संबंध बिघडू शकतात.

प्रोटोज्को यांनी सांगितले की, आपल्या मेंदूमध्ये नेहमी दोन विचार येतात. एक जो सहज आणि त्वरित येतो आणि दुसरा म्हणजे तर्कसंगत विचार असणारा असतो. तर्कसंगत गोष्टी आपण विचार करून कधीच बोलत नाही.  हा रिसर्च सायकोलॉजिकल सायन्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

तसेच आणखी एका अभ्यासात समोर आले आहे की, काही लोकांची कामाबद्दलची धारणाच चुकीची असते, त्यामुळे देखील ते खोटे बोलतात. काही कामांबद्दल धारणा झाली आहे की, हे काम सत्य तोडून मोडून सादर करणारे व्यक्तीच करू शकतात. अभ्यासानुसार, ज्या नोकऱ्यांमध्ये ग्राहकांच्या हितापेक्षा विक्री वाढवण्याकडे लक्ष दिले जाते, त्याच कामांबद्दल अशी धारणा बनते.

 

Leave a Comment