अशा प्रकारे तुम्ही झटपट फेडू शकता तुमचे कर्ज


आपल्यापैकी अनेकजण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत तर करतातच पण काहींची मेहनत तोकडी पडते. पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतात. उदाहरणार्थ त्यांना कर्ज घर, गाडी अशा गोष्टी खरेदी करण्यासाठी घ्यावे लागते. त्यातच घेतलेल्या कर्जाचा हफ्ता काही वेळा आर्थिक तंगीमुळे वेळेवर भरता येत नाही. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला अशा अवघड परिस्थितीत नेमके काय करायचे याबाबतची माहिती देणार आहोत.

कर्ज घेतलेल्या व्यक्तीने जर वेळेवर तीन हफ्ते भरले नाहीत तर बँक आधी नोटीस पाठवते. त्या नोटीशीचे तुम्ही उत्तर दिले नाही तर बँक नंतर कायदेशीर नोटीस पाठवते. असे करुनदेखील तुमच्याकडून काहीच उत्तर आले नाही तर, बँक तुम्हाला डिफॉल्टर कॅटेगिरीमध्ये टाकते. त्यानंतर तुम्हाला आणखी दोन नोटीस बँक पाठवते. त्याचेही उत्तर तुमच्याकडून नाही दिले गेले तर मात्र तुमच्या मालमत्तेचा लिलाव बँक करू शकते.

तुमची मालमत्ता जर बँकेने लिलावात काढली तर तुमचा क्रेडिट स्कोअऱ खराब होतोच. शिवाय भविष्यात कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देत नाही. तुम्हाला जर गृहकर्ज वेळेवर भरण्यासाठी अडचणी येत असतील तर त्यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराशी बोलू शकता. असे केल्याने वेळीच तुमच्या समस्येवर उपाय मिळू शकतो.

तुमचे कर्ज लवकर फेडण्यासाठी तुमच्याकडे पार्शल पेमेंट हा देखील एक पर्याय आहे. तुम्ही या पर्यायाचा वापर केल्यास दिलेल्या वेळेपेक्षा लवकर कर्ज फेडून मोकळे होऊ शकता. पार्शली पेमेंट म्हणजे बोनस स्वरूपात मिळालेली रक्कम, एरियस, शेअर बाजारात झालेला नफा, मित्र- परिवाराकडून बक्षीस स्वरूपात मिळालेली रक्कम अशा अनेक मार्गातून जमा झालेल्या रक्कमेतून तुम्ही वेळे आधी कर्ज फेडू शकता.

तुम्हाला जर एखाद्या बँकेचे व्याजदर जास्त वाटत असेल आणि ती बँक व्याजदर कमी करत नसेल तर तुम्ही बँक बदलून दुसऱ्या बँकेकडे तुमचे कर्ज ट्रान्सफर करू शकता. तुम्हाला यासाठी कुठलीही रक्कम मोजावी लागणार नाही. पण या पर्यायाचा सारखा वापर करु नका. जर सेव्हिंगमधून तुम्ही ईएमआयची रक्कम परतफेड करू शकत असाल तर तुम्ही वेळेआधीच कर्ज फेडू शकतात. प्रत्येक महिन्याला तुम्ही जास्त रक्कम दिली तर तुमचे कर्ज लवकर फेडले जाऊ शकते.