आज तंत्रज्ञानाच्या काळात अनेक गोष्टी अशा आल्या आहेत, ज्यामुळे लोकांच्या आयुष्य एकदम सोपे झाले आहे. लोकांचे काम अगदी जलद होत आहे व वेळही वाचतो. स्मार्टफोनपासून ते स्मार्टवॉचपर्यंत अनेक गोष्टींचा वापर आपल्या रोजच्या जीवनात होत आहे. आता लवकरच स्मार्ट मिरर (आरसा) बाजारात येणार आहे.
आता ‘स्मार्ट आरशा’च्या मदतीने घरीच करा व्यायाम
इंटरेक्टिव फिटनेस कंपनीने आरशाप्रमाणे दिसणारे एक डिव्हाईस तयार केले आहे. या आरशात एलसीडी डिस्प्ले देखील आहे आणि हे डिव्हाईस पर्सनल ट्रेनरप्रमाणे कार्य करते. हा आरसा फिटनेस ट्रेनिंग देण्याबरोबर व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन देखील देईल. या डिव्हाईसची किंमत जवळपास 1 लाख रूपये असण्याची शक्यता आहे.
युजर्स हे डिव्हाईस अपच्या साह्याने मोबाईलला कनेक्ट करू शकतील. हे डिव्हाईस युजर्सला योगा आणि स्टेंथ वाढवण्याची ट्रेनिंग देईल. या डिव्हाईसमध्ये कॅमेरा, ऑडिओ प्लॅटफॉर्म आणि मायक्रोफोनची देखील सुविधा आहे. ट्रेनिंगच्या वेळी डिव्हाईसमध्ये लागलेले कॅमेरे आणि मायक्रोनफोन सुरू होतील. याशिवाय युजर्स डिव्हाईसच्या डिस्प्लेमध्ये वर्कआउटची वेळ, कॅलेरी आणि हार्ट रेट पाहू शकतील.
स्मार्ट डिव्हाईसच्या किंमतीशिवाय युजर्सला 2770 रूपये भरावे लागतील. यामध्ये 30 मिनिटांचे ट्रेनिंग सेशन उपलब्ध होतील. याशिवाय युजर्सला दर महिन्याला लाईव्ह फिटनेस क्लासेस मिळेल.