हा गेम खेळल्यामुळे कमी होते नैराश्य


चीनमधील मध्यमवयीन तसेच वयस्कर लोकांमधील नैराश्य माहजोंग या खेळामुळे दूर होत असल्याचे संशोधनात समोर आले आहे. जर्नल सोशल सायन्स अँड मेडिसिनमध्ये छापून आलेल्या रिपोर्टनुसार, चीनमधील मध्यमवयीन आणि वयस्कर व्यक्तींमधील नैराश्याचे माहजोंग हा गेम सतत खेळल्यामुळे प्रमाण कमी झाले. जॉर्जिया विद्यापिठाचे प्राध्यापक एडम चेन म्हणाले की, या गेममुळे मानसिक स्वास्थ्य चांगले होण्यास मदत होते.

चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून मानसिक आरोग्य चांगले राहणे हा फार महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. जागतिक पातळीवर 17 टक्के चीनमधील नागरिक हे मानसिक विकारांनी ग्रस्त असल्यामुळेच त्यांच्या रिसर्चमध्ये संशोधकांनी 45 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या जवळपास 11 हजार चीनी नागरिकांचा समावेश केला.

त्यांनी यात नैराश्याची लक्षणे पाहिली आणि त्याची तुलना मित्र-परिवारासोबत वेळ घालवणे, माहजोंग खेळणे, एखाद्या खेळात किंवा सामाजिक क्लबमध्ये सहभागी होणे किंवा सामाजिक कार्य करणे असे सर्व पैलू तपासून पाहिले. त्यांनी यात पाहिले की, निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सहभाग घेणे हे चांगल्या मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. त्यातही शहरी भागात माहजोंग हा खेळ खेळणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. नैराश्यग्रस्त ज्याव्यक्ती होत्या आणि माहजोंग हा गेम त्यांनी खेळायला सुरुवात केल्यापासून त्यांच्यातील नैराश्य कमी झाल्याचे दिसले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment