या आउटडेटेट वस्तूंचा आजही वापर करतात लाखो लोक

आज स्मार्टफोनचा वापर प्रत्येक जण करत आहे. त्यामुळे पेजर, कॅसेटचा वापर शक्यतो कोणीही करत नाही. मात्र जापानमध्ये कालपर्यंत पेजरचा वापर करण्यात येत होता. मात्र आता हे पेजर बंद होणार आहेत. जगभरातील अनेक ठिकाणी तुम्हाला पेजरचा वापर होताना दिसेल. केवळ पेजरच नाही तर अशा अनेक वस्तू आहेत, ज्यांना आउटडेटेड म्हटले जाते. मात्र त्यांचा वापर आजही मोठ्या प्रमाणात केला जातो. या वस्तूंबद्दल जाणून घेऊया.

(Source)

पेजर –

पेजर हे एका छोट्या रेडिओ रिसिव्हरप्रमाणे असते. यात प्रत्येक युजर्सचा एक खाजगी कोड असतो. हा कोड लोक संदेश पाठवण्यासाठी एकमेंकाना देऊ शकतात. प्रत्येक संदेश स्क्रीनवर फ्लॅश होत असतो. बीप अशा आवाजाने संदेश येत असल्याने याला बीपर देखील म्हटले जाते. 1950-60 च्या काळात याची सुरूवात झाली होती. 80 च्या दशकात पेजर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. मात्र मोबाईल फोनमुळे पेजरचा वापर कमी झाला.

(Source)

पेजरचा आजही वापर का

ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेमध्ये काम करणारे 1 लाख 30 हजार लोक आजही पेजरचा वापर करतात. एका अभ्यासानुसार, ब्रिटनच्या 80 टक्के हॉस्पिटल्समध्ये पेजरचा वापर करण्यात येतो. कारण हॉस्पिटलमध्ये सिग्नलची समस्या असते व पेजर चांगल्याप्रकारे सिग्नल रिसिव्ह करतात. पेजरचे रेडिओ सिग्नल चांगले असतात.

(Source)

चेक –

चेकबुक बद्दल तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र ऑनलाईन बँकिंगच्या काळात चेकचा वापर कमी झाला आहे. आजही अमेरिकेतील छोट्या दुकांनाचे मालक चेकद्वारे रक्कम मागतात. 2015 मध्ये अमेरिकेत प्रती घरी सरासरी 7 चेकचा वापर करण्यात आला आहे. नेदरलँड, नामिबिया आणि डेनमार्क या देशांनी चेकचा वापर बंद केला आहे.

(Source)

कॅसेट –

आजच्या काळात कॅसेटचा वापर करणेच ही दुर्मिळ गोष्ट आहे. आज शक्यतो कॅसेटचा वापर कोणीही करताना दिसत नाही. कॅसेटमध्ये तुम्हाला रेकॉर्ड देखील करता येत असे.

मात्र आजही काही ठिकाणी कॅसेटचा वापर प्रामुख्याने केला जात आहे. ब्रिटनमध्ये मागील वर्षी कॅसेटच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. मागील सात वर्षांमध्ये कॅसेटच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे.

(Source)

फॅक्स मशीन –

फॅक्स मशीन एका प्रिंटरप्रमाणेच आहे, जे फोनशी जोडलेले असते. टेलिफोन लाईनद्वारे एका मशीनद्वारे दुसऱ्या मशीनमध्ये फॅक्स पाठवला जातो. फॅक्स मशीनचा आजही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. व्यवसाय, लघु उद्योग आणि सरकार विभाग यांचे आधुनिकीकरण झाले नसल्यामुळे फॅक्स मशीनचा वापर केला जात आहे. लाखो फॅक्स आजही एकमेंकाना पाठवले जातात.

 

Leave a Comment