हे दोन कॉलेज ड्रॉप आउट अब्जाधीश दरवर्षी करतात कोट्यावधी रुपयांचे दान

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या बिल गेट्स आणि मार्क झुकरबर्ग हे तर तुम्हाला माहितीच असतील. मात्र तुम्हाला हे माहितीये का, बिल गेट्स आणि मार्क झुकरबर्ग या दोघांनी हॉवर्ड युनिवर्सिटीमध्ये आपली डिग्री पुर्ण केली नाही. दोघेही हॉवर्ड युनिवर्सिटीमधून ड्रॉप आउट आहेत.

(Source)

बिल गेट्स यांनी 2 वर्षातच सोडली हॉवर्ड युनिवर्सिटी –

बिल गेट्स हे अमेरिकन उद्योगपतीबरोबरच गुंतवणूकदार, लेखक आणि मोठ्या प्रमाणात संपत्ती दान करणारे म्हणून देखील ओळखले जातात. त्यांनी 1973 मध्ये हॉवर्ड युनिवर्सिटिमध्य अडमिशन घेतले होते. तेथे ते गणिताबरोबर विज्ञानाचे शिक्षण घेत होते. मात्र 1975 मध्ये त्यांनी शिक्षण सोडले. विशेष म्हणजे याच वर्षी त्यांनी 4 एप्रिलला मायक्रोसॉफ्टची सुरूवात केली. युनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेत असताना गेट्स यांची भेट स्टीव्ह बॉल्मरशी झाली. कॉम्प्यूटर क्षेत्रामध्ये काहीतरी करू इच्छित असल्यामुळे दोघांची चांगली मैत्री झाली. बॉल्मर यांनी मात्र आपले शिक्षण पुर्ण केले.

(Source)

2007 मध्ये युनिवर्सिटीची मानद उपाधी –

हॉवर्ड युनिवर्सिटीने 2007 मध्ये बिल गेट्स यांना मानद उपाधीने सन्मानित केले. बिल गेट्स यांनी आपल्या पत्नीबरोबर मिळून बिल अँन्ड मीलिंडा गेट्स फाउंडेशनची सुरूवात केली आहे. ही जगातील सर्वात मोठी दान करणारी खाजगी संस्था आहे. 2017 या एका वर्षात या संस्थेने 5,100 कोटी डॉलर दान केले होते.

(Source)

मार्क झुकरबर्गने देखील 2 वर्षात सोडली होती युनिवर्सिटी –

जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकचे सीईओ आणि संस्थापक मार्क झुकरबर्गने देखील दोन वर्षातच हॉवर्ड युनिवर्सिटी सोडली होती. 2002 मध्ये मार्कने हॉवर्डमध्ये अडमिशन घेतले होते. 2013 साली हॉवर्ड युनिवर्सिटीने मार्क झुकरबर्गचा मानद उपाधीने सन्मान देखील केला. 2004 मध्येच मार्क झुकरबर्गने फेसबुकची सुरूवात केली होती. आज फेसबुकचे जगभरात 2.4 अब्ज युजर्स आहेत.

(Source)

मार्क झुकरबर्गच्या पत्नीचे नाव प्रिसिला चान आहे. प्रिसिला आणि मार्क यांची भेट हॉवर्ड युनिवर्सिटीमध्येच झाली होती. प्रिसिला हॉवर्डमध्ये मेडिकल स्टुडेंट होती. सप्टेंबर 2016 मध्ये झुकरबर्ग आणि चान यांनी चान झुकरबर्ग एनिशिएटिव्हची सुरूवात केली होती. यामध्ये ते फेसबुकचे काही शेअर्स देतात. ही संस्था एका दशकामध्ये कमीत कमी 3 बिलियन डॉलर रिसर्चवर खर्च करणार आहे. ज्याद्वारे आजारांवरील उपचार सहज उपलब्ध होतील.

Leave a Comment