आपल्या देशातील या ऐतिहासिक वास्तू कमवतात सर्वाधिक पैसा!


आपल्या देशात अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत सरकारने ज्या पाहण्यासाठी तिकीट ठेवले आहे. सरकारला या तिकीटांमुळे दरवर्षी लाखो रुपयांचा नफा होतो. आज आम्ही तुम्हाला त्याच ऐतिहासिक वास्तुंबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे सरकारला लाखो रुपयांचा महसूल मिळतो. त्याचबरोबर तिथून मिळणाऱ्या कमाईबद्दल सांगणार आहोत.

या ऐतिहासिक वास्तुंमध्ये अव्वल स्थानी ताजमहल असून ज्याचे नाव जगातील सात आश्चर्यांमध्ये येते. जगभरातून पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी येतात. पत्नी मुमताजच्या आठवणीत शाहजहांने ही इमारत यमुना नदीच्या किनाऱ्यावर बांधली होती.

जगभरातून अनेक पर्यंटक दिल्लीची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल किल्ल्याला पाहायला येतात. या वास्तूच्या नावाचा सहभाग यूनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये झाला आहे. ही वास्तू 1638 मध्ये बांधण्यात आली होती.

कुतुबुद्दीन ऐबकने बांधलेली कुतूबमिनार ही वास्तू 13 व्या शतकातील आहे. आश्चर्य म्हणजे ही विटांनी तयार करण्यात आलेली सर्वात उंच वास्तू आहे. हिंदू-मुस्लिम वास्तुकलेचं उत्कृष्ट उदाहरण जर पाहायचे असेल तर एकदा तरी कुतूबमिनार आवर्जुन पाहावा.

1570 मध्ये हुमायूं का मकबरा हा तयार करण्यात आला होता. ताजमहल तयार करण्याचा निर्णय हा मकबरा पाहूनच नंतर घेण्यात आला होता. या मकबऱ्याचे डिझाइन आणि बाग पाहण्यासारखी आहे.

ताजमहाल एवढीच फतेहपुर सीकरी प्रसिद्ध आहे. पर्यटक ताजमहल ही वास्तू पाहून झाल्यावर त्याच्या आजूबाजूच्या इमारतीही पाहतात. यातच फतेहपुर सीकरीचा समावेश आहे. मुघल बादशहाच्या आग्र्यापासून 40 किमी दूर असलेल्या या नगरीला पाहायला पर्यटक आवर्जुन जातात.

आगऱ्याचा हा किल्ला ताजमहल एवढा प्रसिद्ध नसला तरी या जागेला भेट देणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. आगऱ्याला येणारे पर्यटक हा किल्लाही पाहताच. राजपूतांची शान दाखवणारा हा किल्लाही कमाईत पुढे आहे.

मध्य प्रदेशमधील खजुराहो या शहराला पाहण्यासाठीही अनेक पर्यटक येतात. भिंतींवर कोरलेल्या मुर्त्यांमुळे या किल्ल्याची प्रसिद्धी आहे. या मुर्तींबद्दल अनेक वर्ष कोणाला माहीत नव्हते. पण या किल्ल्याचा शोध 1850 मध्ये लागला.

Leave a Comment