हा आहे देशातील पहिला तृतीयपंथीय पायलट

केरळ सरकारने 20 वर्षीय एडम हॅरीला देशातील पहिला ट्रांसजेंडर पायलट बनवण्यासाठी ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. एडमच्या सर्व ट्रेनिंगचा खर्च राज्य सरकार करणार आहे. ट्रांसजेंडर असल्याने हॅरीला त्याच्या कुटुंबाने स्विकारले नव्हते. त्याचे लक्ष्य देशातील पहिला ट्रांसजेंडर पायलेट बनणे हे आहे.

असे करून तो आपल्या समुदायातील दुसऱ्या लोकांना स्वतःची स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रेरित करणार आहे. हॅरीने सांगितले की, मी देशातील पहिला ट्रांसजेंडर व्यक्ती आहे, ज्याला प्रायव्हेट पायलट लायसेंस देण्यात येईल. मी कमर्शियल पायलट ट्रेनिंग घेणार आहे, यासाठी सरकारने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

(Source)

हॅरीने सांगितले की, सरकारच्या या निर्णयामुळे मी खूष आहे. मी प्रायव्हेट पायलटची ट्रेनिंग दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथून घेतली होती. एक वर्षांची ट्रेनिंग घेतल्यानंतर मी भारतात परत आलो. परतल्यावर आई-वडिलांना मी ट्रांसजेंडर असल्याचे समजले व त्यांनी मला घरातच कैद केले. त्यावेळी मी 19 वर्षांचा होतो. त्यांनी 1 वर्ष मला घरात कैद केले होते.

हॅरीने पुढे सांगितले की, या काळात त्याला फिजिकली व मेंटली देखील टॉर्चर करण्यात आले. त्यानंतर त्याने घर सोडत नवीन आयुष्यास सुरूवात करण्याचा निर्णय घेतला. घरातून पळून जाऊन तो एर्नाकुलम येथे पोहचला. तेथे त्याला त्याचाच सारखे अनेक ट्रांसजेंडर भेटले.

(Source)

घरातून पळून आल्यानंतर त्याने बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनवर रात्र काढली. पैशांसाठी ज्यूस सेंटरवर काम केले. त्यानंतर एविएशन अॅकेडमिक्स संस्थेत पार्ट टाईम नोकरी सुरू केली. मात्र जेंडर समस्या असल्याने त्याला पगार देखील इतरांच्या तुलनेत कमी दिला जात असे.

हॅरीची माहित समोर आल्यावर त्याला बाल कल्याण विभागाकडून फोन येण्यास सुरूवात झाली व त्याला चांगल्या शिक्षणासाठी आणि एविएशन अॅकडेमीसाठी जस्टिस डिपार्टमेंटशी संपर्क साधण्यास सांगितले.

त्यानंतर त्याला स्कॉलरशीप देखील मिळाली व त्याने राजीव गांधी इंस्टिट्यूट ऑफ एविएशन अँन्ट टेक्नोलॉजीमध्ये अॅडमिशन घेतले.

Leave a Comment