
गांधीनगर – महात्मा गांधीनी आत्महत्या कशी केली ?, असा प्रश्न गुजरातमधील एका शाळेने परिक्षेत विचारल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माध्यमांमध्ये माहिती आली, तेव्हा शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
गुजरातमध्ये शालेय परिक्षेत महात्मा गांधींनी आत्महत्या कशी केली असा प्रश्न
हा प्रश्न गुजरातमधील गांधीनगर येथील सुफलम शाळेच्या नववीच्या परिक्षेत विचारला होता. गुजरातमध्ये दारुबंदी असतानाही दारु गाळण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. एकंदर या प्रकारामुळे गुजरात शिक्षण विभागावरही टीका करण्यात येत आहे. अंतर्गत गुणांसाठी ही परीक्षा होती. शालेय शिक्षणाधिकाऱ्यांची झोप महात्मा गांधी आणि दारु बाबत असा प्रश्न विचारण्यात आल्यामुळे उडाली आहे. याप्रकरणी गांधीनगर जिल्हा शिक्षण अधिकारी भारत वाधेर यांनी चौकशी सुरु केली असून चौकशी अहवालावरुन पुढील कारवाई केली जाईल असे माध्यमांना सांगितले आहे.
