ही आहे देशातील सर्वाधिक ऑनलाईन ऑर्डर केली जाणारी डिश - Majha Paper

ही आहे देशातील सर्वाधिक ऑनलाईन ऑर्डर केली जाणारी डिश

ऑनलाईन फूड अॅपमुळे ऑनलाईन जेवण मागवण्याचे प्रमाण वाढले आहे. नॉन व्हेजचा विषय निघाला की अनेकजण चिकन बिर्याणी ऑर्डर करत असतात. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, ही डिश 600 वर्ष जुनी आहे. म्हणजेच सर्वांच्या आवडीचा हा मेन्यू 6 शतकांपुर्वी प्रथम बनवण्यात आला होता.

वेळेनुसार, यात नवनवीन बदल करण्यात आले. आज याच्या 40 पेक्षा अधिक रेसिपी बनवल्या जातात. रिपोर्टनुसार, मागील दोन वर्षात सर्वाधिक ऑनलाईन ऑर्डर करण्यात आलेली डिश ही चिकन बिर्याणी आहे.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये FICCI-PwC ने प्रकाशित केलेल्या रिपोर्टनुसार, केवळ 2018 मध्ये बिर्याणी डिलिव्हरी इंडस्ट्रीने 2500 कोटींचा व्यवसाय केला आहे. नॅशनल रेस्टोरॉ असोसिएशन ऑफ इंडियाच्या मे महिन्यातील रिपोर्टनुसार, 2018-19 मध्ये फूड डिलिव्हरी इंडस्ट्रीने 4.23 लाख कोटींचा व्यवसाय केला आहे.

2018 मध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारी कंपनी स्विगीवर सरासरी 3.5 सेंकदाला एक बिर्याणी ऑर्डर करण्यात आली होती. यामध्ये पहिल्या क्रमांकावर हैदराबादी बिर्याणी विथ चिकन आणि दुसऱ्या क्रमांकावर मटन होते.  फूड कंपनी झॉमेटोवर देखील सर्वाधिक नॉनव्हेज फूड ऑर्डर करण्यात आले होते.

Leave a Comment