या अभिनेत्रीने सासूच्या वाढदिवसानिमित्ताने लावली 1000 झाडे

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने आपल्या सासूला वाढदिवसाच्या दिवशी खास गिफ्ट दिले आहे. जुही चावलाने दिलेल्या या गिफ्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

जुही चावलाने इंस्टाग्रामवर सासू सुनैनाचा फोटो शेअर केला. फोटो शेअर करताना जुहीने लिहिले की, माझी सासू सुनैना यांच्या वाढदिवसानिमित्त 1000 झाडे लावली. देवाची कृपा नेहमीच माझ्यावर राहावी. जेव्हा कधी मला अडचण आली, त्यावेळी त्यांनी नेहमीच मला पाठिंबा दिला.

जुहीच्या या अनोख्या गिफ्टमुळे तिचे सोशल मीडियावर कौतूक होत आहे. 1995 मध्ये जुहीने उद्योगपती जय मेहता यांच्याशी लग्न केले होते.

जुही चावला आणि जय मेहता यांना जान्हवी मेहता आणि अर्जुन मेहता ही दोन मुले आहेत. 1984 मध्ये जुहीने ‘मिस इंडिया’ हा किताब देखील आपल्या नावावर केला होता.

 

Leave a Comment