नव्या लूकमध्ये परतणार बजाजची ‘चेतक’

बजाज ऑटो सध्या आपल्या नवीन स्कूटरमुळे चर्चेत आहे. दिल्लीत होणाऱ्या इव्हेंटमध्ये 16 ऑक्टोंबरला बजाजची ही नवीन स्कूटर लाँच होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत देखील उपस्थित असतील. कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिकल स्कूटर असेल. कंपनी अर्बनाइट ब्रँड अंतर्गत ही स्कूटर लाँच करेल. या स्कूटरचे नाव ‘चेतक चीक’ असेल.

रिपोर्ट्सुनार, कंपनीच्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्य अनेक सुविधा असतील. लाँचच्या आधी याचे काही फोटो ऑनलाईन लीक झाले आहेत. याचे डिझाईन कंपनीच्या जुन्या स्कूटर प्रमाणे असू शकते.

(Source)

फीचर्सबद्दल सांगायचे तर नवीन मॉडेलमध्ये इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम मिळेल. याशिवाय डिजिटल इंस्ट्रूमेंट पॅनेल, ओडोमीटर, ट्रिपमीटर, नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिविटी आणि बॅटरी रेंज सारखे फीचर्स मिळतील.

लीक झालेल्या फोटोनुसार, यामध्ये रूंद फ्रंट ऐप्रन, कर्व साइड पॅनेल आणि मोठे रिअर व्यू मिरर सारखे फीचर्स बघायला मिळू शकता. याचबरोबर अलॉय व्हील, फ्रंट व रिअर डिस्क ब्रेक, LED हेडलँम्प आणि टेल लँम्प्स असू शकतात.

(Source)

या स्कूटरची किंमत 1 लाखांच्या जवळ असण्याची शक्यता आहे. तसेच सुरूवातीला पुणे व बंगळुरूमध्ये स्कूटरची विक्री सुरू करण्यात येणार असून, नंतर दुसऱ्या शहरांमध्ये स्कूटरची विक्री सुरू होईल.

बजाजने आपली जूनी स्कूटर चेतकचे उत्पादन 2006 मध्येच बंद केले होते. मात्र आता कंपनी नव्या लूकमध्ये चेतक बाजारात आणत आहे.

Leave a Comment