सिमोन बाईल्स, सर्वाधिक मेडल मिळविणारी जिम्नॅस्ट


अमेरिकेच्या स्टार जिम्नॅस्ट सिमोन बाईल्स हिने वर्ल्ड चँपियनशिप मध्ये अतिशय उत्कृष्ठ कामगिरी बजावून एकूण पाच इव्हेंटमध्ये विजेतेपदावर स्वतःचे नाव कोरले आहे. अमेरिकेत जिम्नॅस्ट क्वीन नावाने परिचित असलेल्या सिमोनने रविवारी जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रकारात इतिहास रचला. तिने यावेळी सर्वाधिक मेडल्स मिळविणारी जिम्नॅस्ट अशी स्वतःची नवी ओळख घडविली. बॅलन्स बीम, फ्लोर एग्झरसाईजमध्ये गोल्ड मिळविताच तिने बेलारूसचा पुरुष जिम्नॅस्ट विटली शेर्बो याचा २३ मेडलचा विक्रम तोडून २४ वे गोल्ड मेडल मिळविले आणि दोन तासानंतर लगेच २५ वा विश्व चँपियन खिताब जिंकला.


सिमोनने यावेळी पाच इवेंट जिंकले. मंगळवारी तिने टीम इव्हेंटचे गोल्ड जिंकले होते. शनिवारी व्होल्ट फायनलचा १७ वा खिताब जिंकला आणि इतिहास रचला. आता जिम्नॅस्टिक्स प्रकारात सर्वाधिक गोल्ड मेडल मिळविण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिच्या एकूण २५ मेडल्स मध्ये १९ गोल्ड मेडल आहेत. यापूर्वी सर्वाधिक मेडल्स जिंकण्याचा विक्रम केलेल्या शेर्बोच्या २३ मेडल्स मध्ये फक्त १२ गोल्ड आहेत.

Leave a Comment