मोदींची इन्स्टाग्रामवर टॉप कामगिरी


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल साईट इन्स्टाग्रामवर नवे रेकॉर्ड नोंदविले आहे. मोदी यांच्या इन्स्टाग्रामवरील फोलोअर्सची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून मोदी जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते बनले आहेत. बीजेपीचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी ट्विटरवर या संदर्भात माहिती दिली असून मोदींच्या फॉलोअर्सनी ३ कोटीच्या टप्पा पार केला आहे. या बाबतीत मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याना मागे टाकले आहे.

नड्डा यांच्या म्हणण्यानुसार मोदींचा तरुणाईशी होत असलेला संवाद आणि त्यांची लोकप्रियता याचा हा मोठा पुरावा आहे. इन्स्टाग्रामवर १०० कोटीं लोकांचा डेटाबेस आहे त्यात बराक ओबामा यांच्या फॉलोअर्सची संख्या २.४ कोटी असून डोनाल्ड ट्रम्प यांचे १.४ कोटी फॉलोअर्स आहेत. मोदी हे ट्विटरवर सुद्धा सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते असून या मायक्रोब्लॉगिंग साईटवर त्यांचे ५.७ कोटी फॉलोअर्स आहेत, फेसबुकवरील मोदी फॉलोअर्सची संख्या ४.४ कोटी आहे. इन्स्टाग्रामने मे मध्ये जाहीर केलेल्या यादीनुसार बॉलीवूड तारका प्रियांका चोप्रा चे सर्वाधिक म्हणजे ३ कोटी ९ हजार फॉलोअर्स होते, नव्या आकडेवारीत मोदी यांनी प्रियांकालाही मागे टाकले आहे.

Leave a Comment