चक्क विमानाबरोबर पाच वर्षे डेटिंग करतेय ही तरुणी - Majha Paper

चक्क विमानाबरोबर पाच वर्षे डेटिंग करतेय ही तरुणी


प्रेम कुणी, कुणावर, कधी, कसे करावे याबाबत कोणतेही ठोस नियम नाहीत. कारण प्रेम केले जात नाही, ते होते असे म्हणतात. जर्मनीच्या एका तीस वर्षीय तरुणीच्या प्रेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मिशेल कोब्रे नावाची ही युवती चक्क एका विमानाच्या प्रेमात पडली असून या विमानाबरोबर गेली पाच वर्षे ती डेटिंग करते आहे. पुढे जाऊन या विमानासोबत तिला लग्न करण्याची इच्छा आहे.


मिशेल सांगते तिचे बोईंग ७३७ -८००वर खूप प्रेम असून त्यांची रिलेशनशिप रोमँटिक रिलेशनशिप आहे. ती प्रेमाने या विमानाला डार्लिंग म्हणते. मिशेलच्या मते हे विमान खुपच आकर्षक आणि जगातील सर्वात सुंदर आहे. ती सांगते, नोव्हेंबर २०१३ मध्ये ती प्रथम या जातीच्या विमानात बसली आणि मार्च २०१४ मध्ये त्याच्या प्रेमात पडली. तिच्याकडे सध्या बोईंग ७३७-८०० चे एक छोटे मॉडेल असून त्याच्या गळ्यात गळा घालून ती रात्री झोपते. आमचे नाते नॉर्मल नाते असून रोज संध्याकाळी आम्ही एकत्र वेळ घालवितो असेही ती सांगते. तिला या विमानासोबत लग्न करायचे आहे मात्र समाज अजून अशी लग्ने स्वीकारत नाही याची तिला खंत वाटते.

एखाद्या वस्तूच्या प्रेमात पडणे हा एक प्रकारचा आजार असून त्याला ऑब्जेक्टफिलिया असे म्हटले जाते. यात माणसाला एखाद्या वस्तूबद्दल इतके प्रेम वाटते की ती वस्तू त्याच्यासाठी सर्वस्व बनते. समाज हळूहळू ही भावना आता स्वीकारू लागला आहे असे या क्षेत्रातील तज्ञ सांगतात.

Leave a Comment