प्रेमासाठी कायपण…


कांगडा – म्हणतात ना प्रेमाला उपमा नाही ते देवा घरचे देणे… खऱ्या प्रेमावर जात, धर्म व देशांच्या सीमा मर्यादा आणू शकत नाहीत. हिमाचल प्रदेशमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. आपले भारतातील प्रेम मिळविण्यासाठी एक अमेरिकन तरुणी सात समुद्रापार आपले सर्वकाही सोडून भारतात दाखल झाली आहे.

सोशल मीडियावर अमेरिकेच्या वॉशिंग्टन शहरात राहणाऱ्या ‘मेरी’ ची कहाणी व्हायरल झाली आहे. या अनोख्या प्रेमकथेची चर्चा सर्वत्र होत आहे. एक आख्यायिका बनून राहिली आहे ही प्रेमकथा.

भारतात अमेरिकन तरुणी ‘मेरी’ टूरिस्ट व्हिसा घेऊन आली होती. ती दिल्ली, धर्मशाळा फिरून झाल्यानंतर चंबा जिल्ह्यातील डलहौसी पोहोचली. तेथे तिची ओळख एका स्थानिक तरुणाबरोबर झाली. ओळखीचे रुपांतर हळू-हळू प्रेमात झाले. त्यानंतर ‘मेरी’ परत आपल्या देशात परतली. परंतु तिचा प्रियकराशी संपर्क कायम राहिला. ‘मेरी’ आता आपले सर्वकाही त्याग करून भारत पुन्हा दाखल झाली आहे व डलहौसीमध्ये आपल्या प्रियकरासोबत राहु लागली आहे. दोघे लवकरच हिंदू रीति रिवाजाप्रमाणे लग्नबंधनात अडकणार आहेत.

‘मेरी’ च्या प्रियकराचे नाव पृथ्वी सिंह आहे. ‘मेरी’चे म्हणणे आहे की, भारतीय पती नातेसंबंधाच्या बाबतीत विश्वासू असतात. त्यामुळेच तिने तिचे यापुढील आयुष्य भारतातच घालविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पृथ्वी सिंह हलहौसी येथील एका हॉटेलमध्ये हेल्परची नोकरी करण्याबरोबरच स्थानिक शाळेत मुलांना कराटेचे प्रशिक्षण देतो. ‘मेरी’ ने तिची प्रेम कहाणी सोशल मीडियावर शेअर करताना तिचे व प्रियकर पृथ्वी सिंहचे फोटोही शेअर केले आहेत. मेरीने आपल्या शरिरावर तिच्या प्रियकराच्या नावाचा टॅटू काढला आहे.

Leave a Comment