ही आहे जगातील सर्वात मोठी जीभ असलेली चिमुकली !

baby
नवी दिल्ली – हल्लीच एका लहान चिमुकलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर झाला असून ज्यामध्ये तिच्या जीभेचा आकार हा तिच्या चेहऱ्यापेक्षा दुप्पट आहे.

सिंड्रोम (BWS) या आजाराने साऊथ डैकोटामध्ये जन्मलेली ही मारिसन जॉनसन नावाची मुलगी बेकविथ वीडेमन पिडीत असून याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या चिमुकलीची जीभ जगातील सर्वात मोठी असल्यामुळे जन्मतःच या मुलीच्या जीभेचा आकार हा तिच्या चेहऱ्यापेक्षा अधिक दुप्पट आहे. या आजाराबद्दल दरवर्षी ११,००० मुले कंटाळलेले असते.

या चिमुकलीला जीभ मोठी असल्यामुळे त्याचा भयंकर त्रास होत आहे. तिला काहीही खाता येत नाही की पिता येत नाही. या जिभेमुळे तिला दूध पिणे देखील अशक्य झाले आहे. त्यामुळे गेल्या ६ महिन्यांपासून या मुलीला ट्यूबच्या मार्फत दूध पाजले जात आहे. एवढंच नाही तर मोठी जीभ असल्यामुळे या मुलीला श्वास घेण्यास देखील त्रास होत आहे. अनेकदा तिला श्वास घेताना इतका त्रास होतो की तिला श्वासोच्छवासाची मशिन लावावी लागते. एडल्ट साइज टंगसोबत जन्माला आलेल्या या मुलीचे नुकतच ऑपरेशन करण्यात आले आहे. सर्जरीनंतर पहिल्यांदाच ही मुलगी आनंदाने हसली आहे. आणि तिच्या या क्षणाला कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे.

Leave a Comment