स्तनपान हे बाळाच्या आरोग्यासाठी नवसंजीवनी

breast-feeding
मुंबई – बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी आईचे दुध हे सर्वोत्तम असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. बाळाच्या आरोग्यासाठी स्तनपान हे नवसंजीवनी देणारे ठरू शकते. बाळाच्या सर्वांगिण विकासासाठी ते आवश्यक असून या दुधात असणारे प्रोटिन आणि खजिनांचे प्रमाण हे बाळाला सर्व आजारांशी मुकाबला करण्यासाठी मदत करते. पहिल्या सहा महिन्यात बाळाचे स्तनपान हे अत्यंत महत्वाचे असल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. लठ्ठपणा, मधुमेह आणि कुपोषणाने होणारे आकस्मिक मृत्यू टाळण्यासाठीही स्तनपान हाच सर्वोत्तम मार्ग आहे. महिलांच्या आरोग्यासाठी हे चांगले असल्याचे समोर आले आहे. स्तनाचा कर्करोग, वजनवाढ रोखण्यासाठीही ते आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment