सकाळी पाणी का प्यावे?

water
पाणी पिण्याच्या बाबतीत अनेक प्रकारचे नियम सांगितले जातात. भरपूर पाणी पिल्याने त्वचा चमकदार होते, अन्नपचन होते असे तर सांगितले जातेच पण आजकाल तेवढेच न सांगता इतरही काही बाबी सांगितल्या जायला लागल्या आहेत. त्यातली पाहिली म्हणजे पाणी शक्यतो कोमट असेल तर प्यावे फार थंड पाणी पिऊ नये. सकाळी भरपूर पाणी प्यावे आणि संध्याकाळी कमी पाणी प्यावे. जसजशी रात्र होईल तसतसे पाण्याचे प्रमाण कमी करत न्यावे. वगैरे वगैरे नवे नियम आता पुढे येत आहेत. त्यातील सकाळी पाणी का प्यावे याची कारणमीमांसा सांगितली जाते ती खालीलप्रमाणे आहे.

सकाळी उठल्यानंतर कमीत कमीत एक ग्लास साधारण कोमट पाणी रिकाम्या पोटी प्यावे कारण त्यामुळे रात्री झालेले डिहायड्रेशन भरून निघते. आपण रात्री पाणी पित नाही. झोपेतले सात-आठ तास आपल्या शरीराला पाणी मिळालेले नसते. ती पाण्याची कसर सकाळच्या उपाशी पोटी पिलेल्या पाण्याने भरून निघते. सकाळच्या पाण्यामुळे पचन सुधारते. ते पाणी रक्तातील अशुध्द घटक वेगळे करते आणि रक्त शुध्दीकरण करते.

एवढेच करून हे पाणी थांबत नाही तर ते नवीन रक्तपेशी निर्माण करते. नवीन स्नायूंची निर्मितीसुध्दा करते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वजन घटवण्यास ते उपयोगी पडते. असे सकाळचे पाणी पिल्यानंतर काही क्षण तर काही खाऊ नये. या पाण्याच्या उपायाचे कसलेही दुष्परिणाम होत नाहीत. तज्ञांच्या मते असे चार ग्लास पाणी प्यावे परंतु तेवढे जमत नसल्यास निदान एक ग्लास तरी प्यावाच हे प्रमाण वाढवत वाढवत चारापर्यंत न्यावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment