लिंबू पाणी अनेक विकारांवर उपयोगी

lemon-water
लिंबू हे किती गुणकारी आहे हे सर्वांना माहीत आहे. पाणी हे काय प्रकरण आहे सर्वजण जाणतात. परंतु लिंबू आणि पाणी एकत्र केल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो हे मात्र बर्‍याच लोकांना माहीत नाही. लिंबू आणि पाणी एकत्र केल्यास अनेक फायदे होतात. ते फायदे समजून घेतले पाहिजेत. सकाळच्या ब्रेकफास्टला ग्रीन टी किंवा ग्रीन कॉफी पिणार्‍यांचे प्रमाण आता वाढत चालले आहे. परंतु ग्रीन टी बरोबरच किंवा ग्रीन टी नंतर लिंबू पाणी एकत्र करून पिले तर त्यामुळे त्वचेची तकाकी वाढण्यास मदत होते. लिंबू पाणी प्राशन करण्याने चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होतात आणि शरीराचे वृध्दापकाळामुळे होणारे नुकसान टळण्यास उपयोग होतो.

लिंबू प्राशनामध्ये पचनसंस्था सुधारण्याची मोठी ताकद आहे. परंतु हे लिंबू पाणी घेताना पाणी थंड घेऊ नये तर कोमट घ्यावे. या कोमट पाण्याने रक्तशुध्दी होण्यासही मदत होते. मलावरोध कमी होतो आणि शरीरातील अनेक प्रकारची विषे आपोआप बाहेर फेकली जातात. लिंबू पाणी प्राशन केल्याने श्‍वासाचा दुर्गंध कमी होतो. दातांचे दुखणे कमी होते आणि हिरड्यातून येणारा रक्तस्राव कमी होतो. लिंबातील पोटॅशियममुळे रक्तदाबाचा विकार आटोक्यात राहतो. भूक मंदावली असेल तर ती वाढते. मानसिक दडपण असेल तर ते कमी होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment