‘रस्ते का माल सस्ते में’

mobile
आजच्या पिढीतला तरुण म्हणा अथवा वयोवृद्ध हा टेक्नोसॉव्ही झाल्यामुळे स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. हे ओळखूनच अनेक मातब्बर कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्टफोन बनवतात. या स्मार्टफोनची किंमत ही त्यात असलेल्या विविध सुविधांवर अवलंबून असते. त्यामुळे अशा स्मार्टफोनची किंमत काही हजारांपासून ते लाखांच्या घरात जाते. पण, या जगात एक असेही ठिकाण आहे, जेथे हे भाजीपाला, वडापाव प्रमाणे स्मार्टफोन रस्त्यांवर मिळतात. येथे अत्यंत साध्या पद्धतीचा फोन केवळ १०० टाकामध्ये म्हणजेच भारतीय रूपयांत केवळ १०० रुपयांमध्ये मिळतो. येथे फोनच्या क्लालिटीवरून फोनची किंमत कमी जास्त होते. हे मोबाईल मार्केट तब्बल अर्धा किलोमीटरच्या परिसरात पसरलेले असते. या बाजारात केवळ साधे फोनच नव्हे तर, स्मार्टफोन आणि त्याला लागणाऱ्या इतर एक्सेसरीजही मिळतात. जसे की, बॅटरी, चार्जर, हेडफोन्स, फोन कव्हर यांसारख्या वस्तूही येथे अत्यल्प भावात मिळतात.

भारताशेजारील राष्ट्र बांग्लादेशात इतक्या स्वस्ताईने स्मार्टफोन मिळणारी ही बाजारपेठ आहे. नोकिया, सॅमसंग, एचटीसी, सोनी, माईक्रोमॅक्स, सिम्फोनी यांसारख्या नावाजलेल्या कंपन्यांचेही फोन या बाजारपेठेत मिळतात. एवढेच नाही तर, येथे आयफोनच्या नावाखीली डुप्लिकेट स्मार्टफोनही मिळतो. येथे विक्रीसाठी एणारे फोन हे चोरीचे असतात किंवा अनेकांनी वापरून सेंकड हॅन्ड विक्री केलेले असतात. या मार्केटमध्ये आयफोन ६७७४ रूपयांना तर, एचटीसी ६३५१ रूपयांना मिळतो. जुने पुराने मोबाईलही या मार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवलेले असतात. येथील व्यापारी यूनूसने भास्कर.डॉट कॉमला दिलेल्या माहितीनुसार, येथील सर्व फोन हे विविध बाजारांतून किलोवर विकत घेतले जातात. जेथे इलेक्ट्रॉनिक वस्तू भंगार किंवा अत्यंत टाकाऊ म्हणून विकल्या जातात. येथे येणारे ग्राहक हे दुरूस्त होऊ शकतील किंवा किमान काही दिवस तरी, वापरता येऊ शकेल अशा प्रकारचेच मोबाईल आणि इतर वस्तू खरेदी करतात. कधी कधी आम्ही एका फोनचे पार्ट दूसऱ्या फोनला लावूनही मोबाईल सुरू करतो आणि विकतो. तर, कधी कधी मोबाईलची बॉडी बदलूनही विकतो. हे काम करण्यासाठी आम्ही खास प्रशिक्षण घेतलेले असते, असेही यूनस सांगतो.

दरम्यान, येथे एकदा विकलेली वस्तू पुन्हा परत घेतली जात नाही. फोन खरेदी करतानाच फोन पुर्णपणे तपासून घेण्याची संधी येथे ग्राहकाला मिळते. मात्र, एकदा का ग्राहकाने हा फोन विकत घेतला तर, तो कोणत्याही परिस्थीतीत परत घेतला जात नाही. येथे विकल्या जाणाऱ्या कोणत्याही वस्तूची गॅरेंटी, वॉरंटी दिली जात नाही. येथे फोन सोबत इतरही इलेक्ट्रॉनिक वस्तू विकले जातोत. जसे की, VCD प्लेयर्स, कॅसेट प्लेयर्स, रेडियो, स्मॉल टीव्ही सेट, कॉम्प्यूटर पार्ट्स, इस्त्री, टेबल फॅन, बॅटरी,, स्टीरियो, वूफर, हेयरड्रायर विकले जातात. येथील मार्केट हे सुमारे २०० कामगारांचा जीवनाचा आधार आहे. येथे व्यवसाय उभारण्यासाठी महिन्याला ६० रूपये जागाभाडे आणि १६ रूपये विजबील येते.

Leave a Comment