रक्तदाबासंबंधी काही पथ्ये

blood-pressure
जगातल्या तीन ज्येष्ठ नागरिकांपैकी एकाला हाय ब्लडप्रेशरचा त्रास होतो. वयोमानानुसार हे अटळ आहे. असे सांगितले जात असले तरी काही वेळा हे ज्येष्ठ नागरिक आपल्या हातून नकळतपणे उच्च रक्तदाबाचे संकट ओढवून घेत असतात. म्हणून त्यांनी काही पथ्ये पाळण्याची गरज आहे. सोडियमचे अतिरेकी सेवन रक्तदाबास कारणीभूत ठरते. मात्र सोडियम नेमका कशातून मिळतो हेच माहीत नसल्यामुळे नकळतपणे हे लोक सोडियमचे अती सेवन करतात. संध्याकाळी चौपाटीवर गेले म्हणजे चायनीज भेळ खाल्ल्याशिवाय करमत नाही. परंतु चायनीज पदार्थातील सोया सॉस, तेरियाकी सॉस, बीन सॉस किंवा गार्लिक सॉस यांच्या सोडियम विपुल प्रमाणात असते. उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍या ज्येष्ठांनी चायनीज पदार्थांपासून चार हात दूरच राहिले पाहिजे.

व्यायाम केल्याने प्रकृती चांगली राहते हे तर सत्यच आहे. परंतु चुकीच्या पध्दतीने केलेला व्यायाम उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना महागात पडू शकतो. म्हणून रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी अती व्यायाम करू नये आणि व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हीच गोष्ट प्रथिनांच्या ज्यादा सेवनाने लागू पडते. प्रथिनांचे ज्यादा सेवन केल्यास आरोग्य चांगले राहते ही गोष्ट खरी परंतु हा नियम रक्तदाबाच्या रुग्णांना लागू नाही. माणूस थोडासा वृध्द झाला की दुपारच्या लंचनंतर वामकुक्षी ही आवश्यकच वाटायला लागते. मात्र रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ती फायदेशीर आहेच असे नाही. दुपारी झोप घेणार्‍यांना रक्तदाबाचा त्रास होण्याची १५ ते २० टक्के जादा शक्यता असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment