पाणी मर्यादितच पिणे आवश्यक

water
आरोग्याच्या बाबतीत बर्‍याच गोष्टी सांगितल्या जातात. चहा पिणे आरोग्याला उपकारक असल्याचे एखादे संशोधन समोर येते आणि दुसर्‍याच वर्षी तो अपायकारक असल्याचेही संशोधन समोर येते. अशी उलटसुलट संशोधने समोर आल्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. भरपूर पाणी पिल्याने शरीरातल्या चयापचय क्रिया छान चालतात आणि त्वचा तजेलदार होते म्हणून दिवसाकाठी आठ ग्लास पाणी प्यावे असा आदेश कोणी तरी देते आणि आपण भराभर पाणी प्यायला लागतो. मात्र आता संशोधकांनी दिवसाकाठी आठ ग्लास पाणी पिण्याची गरज नाही असा नवा निष्कर्ष समोर आणला आहे. उलट एवढे पाणी प्राशन केले तर पाण्यातून एक प्रकारची विषबाधासुध्दा होऊ शकते असा इशारा दिला आहे.

ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथील मोनॅश विद्यापीठाच्या संशोधकांनी हे संशोधन पुढे आणले आहे. पाण्यासह सर्व प्रकारच्या द्रवांचे शरीरावर होणारे परिणाम या संशोधकांनी तपासले तेव्हा असे आढळूनल आले की गरजेपेक्षा अधिक द्रव पदार्थ शरीरात घेतले तर ते घातक ठरू शकतात. तेव्हा पाणी पिण्याचे अतिरेक टाळले पाहिजे. शरीराला पाण्याची गरज असते. परंतु पाण्याची गरज आहे म्हणून नुसतेच पाणी पित सुटलो तर फायद्यापेक्षा तोटाच जास्त व्हायचा. वनस्पतीच्या बाबतीत आपण अनुभव घेत असतो. शेतातल्या पिकाला पाणी लागते म्हणून भरमसाठी पाणी दिले तर पिके पिवळी पडू लागतात. याचाच अर्थ पिकांना मर्यादेपक्षा अधिक पाणी लागत नाही असा होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment