न्यूयॉर्कमध्ये मिळते जगातील महागडे आईस्क्रीम

ice-cream
न्यूयॉर्क : तुम्ही कधी सोन्याचे आईस्क्रीम खाल्ले आहे का? अशाच प्रकारचे आईस्क्रीम न्यूयॉर्कमधील ‘सेरेनड्रिपीटी ३’ या कॅफेत मिळते. या आइस्क्रीममध्ये ५ ग्रॅम सोने टाकले जाते. या सोन्याच्या आइस्क्रीमची किंमतही सोन्यासारखीच आहे. तब्बल ५४ हजार रुपये एका स्कूपसाठी द्यावे लागतात. या आईस्क्रीमचे नाव फ्रोझन हाँटे चॉकलेट असे आहे. तसेच गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही या आईस्क्रीमचा समावेश आहे. या आईस्क्रीममध्ये तब्बल २८ प्रकारचे चॉकलेट वापरले जाते. तसेच २३ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.

Leave a Comment