तुकतुकीत त्वचेसाठी फळांचे रस

juice
भारतीयांना गोर्‍या त्वचेचे भारी वेड आहे. आपली त्वचा गोरी असावी यासाठी भारतीय लोक भरपूर वेळही खर्च करतात आणि पैसाही खर्च करतात. परंतु काही तज्ञांच्या मते एवढा खर्च करण्याची गरज नाही. काही साध्या उपायांनी त्वचा तजेलदार आणि गोरी होऊ शकते. १. सफरचंदाचे क्रिम – सफरचंदामध्ये अल्फा हैड्रॉक्सी ऍसिडस् असतात आणि त्यांचा उपयोग त्वचा गोरी होण्यासाठी होऊ शकतो. सफरचंदाचे तुकडे करून ते तुकडे पाण्यात टाकावेत आणि त्याची पेस्ट तयार करून चेहर्‍यावर लावावी दहा मिनिटांनी ती पेस्ट काढून चेहर्‍याला लिंबाचा रस लावावा आणि पंधरा मिनिटांनी चेअरा चांगला चोळून बर्फाने धुवावा.

२. संत्र्याच्या रसातसुध्दा हाच गुणधर्म आहे. संत्र्याच्या फोडी काढून तो अतीशय थंड करावा आणि तो कापसाच्या बोळ्याने हलकाच लावावा. पाच ते सात मिनिटे लावावे. असा प्रकार सात दिवस केल्याने त्वचा तजेलदार आणि तुकतुकीत होते. ३. टमाट्याचा रस – टमाट्याचा गर घ्यावा आणि त्यात एक टेबलस्पून बेकिंग सोडा टाकावा. ही पेस्ट चेहर्‍यावरही लावावी आणि मानेवारही चोळावी. विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे कातडीचा गेलेला रंग परत येऊ शकतो.

४. पपई आणि काकडी – पपई आणि काकडी सम प्रमाणात घेऊन ती मिक्सरमध्ये छान घोळून घ्यावी ती खूप मऊ झाल्यानंतर तिच्यामध्ये एक चमचा भरून दुधाची साय टाकावी. त्यानंतर तयार झालेली पेस्ट चेहर्‍याला लावावी आणि २० मिनिटांी धुवून टाकावी. ५. दही आणि हळद – द्ह्यामधील कोरोझिव्ह हे त्वचेवर चांगला परिणाम करते. हळदीमध्येही वार्धक्याचे परिणाम टाळण्याचे ताकद असते. एक चमचा हळद, एक चमचा मध आणि तीन चमचे दही एकत्र करून ते कुलरमध्ये ठेवावे आणि २० मिनिटांनी ही पेस्ट चेहर्‍यावर लावावी आणि १५ मिनिटांनी चेहर्‍यावर लावावा. या घरगुती उपायांनी चेहरा सुंदर दिसू शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment