तणाव शत्रूला दूर कसे ठेवावे

tension
तणाव हा माणसाचा मोठा शत्रू आहे. तणावामुळे पित्त आणि रक्तदाब वाढतात आणि सर्वसाधारणपणे माणसाची रोगप्रतिकार क्षमता घटते. त्यामुळे अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी आधी तणावावर विजय मिळवला पाहिजे. ही गोष्ट फार अवघडही नाही. काही उपायांनी ती सहजपणे शक्य होणारी गोष्ट आहे. त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे धूम्रपान टाळले पाहिजे आणि मीठ कमी खाल्ले पाहिजे. हे उपाय तर नेहमीच सांगितले जातात. परंतु आता सध्या तज्ञांनी काही वेगळे उपाय सांगायला सुरूवात केली आहे.

पहिला उपाय म्हणजे सतत ऍक्टिव्ह रहा. दिवसातून किमान ३० मिनिटे कसला तरी व्यायाम करा. असा व्यायाम केला नाही तर हृदयविकाराची शक्यता वाढते. परंतु व्यायामाने मात्र मानसिक तसेच शारीरिक दोन्ही क्षमता वाढू शकतात. हे उपाय योजतानाच आपल्या शरीरामध्ये जादा चरबी जमा होत नाही ना याकडे लक्ष दिले पाहिजे आणि चरबी वाढण्याचे पहिले लक्षण म्हणजे कंबरेचा घेर वाढणे. सातत्याने कंबरेच्या घेरावर लक्ष ठेवा.

या सर्व विकारांमध्ये आनुवंशिकतेचा मोठा हिस्सा असतो. त्यामुळे आपल्या घरात, कुटुंबात अशा विकारांची परंपरा आहे का याचा इतिहास तपासून पाहिला पाहिजे. आई किंवा वडील यांना बिपी, पित्त तसेच हृदयविकार असेल तर तो आपल्याला होण्याची जास्त शक्यता असते. अशा लोकांनी सावध राहिले पाहिजे. शेवटचा महत्त्वाचा उपाय म्हणजे सतत हसत रहा, आनंदी रहा हा सर्वात प्रभावी उपाय आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment