खाल्ल्या मिठाचे परिणाम

salt
खाल्ल्या मिठाला जागावे असे आपले नीतीशास्त्र सांगते. सगळेच लोक खाल्ल्या मिठाला जागत नाहीत. पण मीठ मात्र याबाबतीत पक्के कृतज्ञ असते. जो जास्त मीठ खाईल त्याच्या शरीरात मीठ अगदी इमानदारीने आपले परिणाम दाखवतोच. एखादा पदार्थ थोडेसे जादा मीठ घालून खाल्ले तर बरा लागतो परंतु हेच मीठ आपल्या शरीराचा शत्रू बनत असते. आपण कितीही दुर्लक्ष केले तरी मीठ आपला प्रताप दाखवतेच. अधिक मीठ खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो हे तर सर्वांना माहीतच झालेले आहे. म्हणून रक्तदाबाची तक्रार घेऊन एखादा पेशंट डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर रक्तदाबाची गोळी तर देतातच पण मीठ कमी खाण्याचा सल्ला देतात.

ज्यादा मीठ खाल्ल्याने हृदयविकाराची शक्यता वाढते. त्याचबरोबर रक्तदाब वाढल्यामुळे आणि शरीराच्या हालचाली कमी झाल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. मिठातील सोडियममुळे मूत्रपिंडाच्या कार्यालवरही परिणाम होतो. मूत्रपिंड हे शरीराच्या रक्तातील अशुध्द घटक गाळून रक्ताला शुध्द घटक मिळवून देणारा अवयव असतो. ते एक प्रकारचे फिल्टर असते. मात्र हे फिल्टर मिठामुळे बाधित होते आणि फिल्टरचे काम म्हणावे तसे होत नाही. रक्तात अशुध्द घटक मिसळले जातात आणि त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. ज्यादा मीठ खाण्याने त्वचेवरही परिणाम होतात. त्वचा फुगायला लागते. म्हणजे चेहरा, हात, पाय, विशेषतः मनगट सुजल्यासारखे होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment