खाद्यपदार्थांच्या विक्रीतून येथील महिला कमवतात ७० कोटी रुपये

uttarsnda
उत्तरसंडा : जगभरामध्ये पापड, मठिया आणि चोलाफली या खायच्या पदार्थांसाठी गुजरातमधील उत्तरसंडा हे गाव प्रसिद्ध असून या गावातील महिला दिवाळीच्या दिवसांमध्ये याच पदार्थांमुळे ७० कोटी रुपयांचा व्यापार करत आहे. या महिलांनी बनवलेल्या पापड, मठिया आणि चोलाफलीला जगभरातही मोठी मागणी आहे.

३५ पेक्षा जास्त फॅक्ट्री २० हजार लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये गृहउद्योगाच्या आहेत. उत्तरसंडामध्ये या व्यापाराला ३० वर्षांपूर्वी सुरुवात झाली. या भागातल्या फॅक्ट्री दिवाळीच्या दिवसांमध्ये तीन ते सहा टन पेक्षा जास्त मठिया आणि चोलाफली बनवतात. दिवाळीच्या एका महिन्यामध्येच उत्तरसंडामधल्या महिला ७०० टनपर्यंत खाद्य पदार्थ बनवतात. यापैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन हे निर्यात केले जाते, तर १५ टक्के उत्पादन हे गुजरातच्या बाहेर जाते. उत्तरसंडामध्ये बनलेली मठिया आणि चोलाफली तीन महिन्यांपर्यंत टिकू शकते.

Leave a Comment