केळीची बदनामी

banana
वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये याची भली मोठी यादी सादर केली जाते. परंतु त्या यादीमध्ये केळींचा उल्लेख वर्ज्य यादीमध्ये केला जातो. म्हणजे एक गोष्ट उघड आहे की वजन कमी करायचे असेल तर केळी अजिबात खाऊ नये. केळी, चिकू यामुळे वजन वाढते असे आहारतज्ञ सांगत असतात. मात्र काही तज्ञांनी उलट दावा केला आहे आणि केळीने वजन वाढत नसून घटते असे सांगायला सुरूवात केली आहे. केळी खाल्ल्याने शरीराला पोटॅशियम भरपूर मिळते आणि त्यामुळे पाणी कमी पिले जाते. परिणामी शरीर फुगत नाही. ज्यांना पोट सुटले असेल त्यांच्यासाठी केळी हा आदर्श आहार आहे.

केळीमध्ये चाओलिन हे द्रव्य असते आणि त्यात ब जीवनसत्त्वाचे सगळे प्रकार आढळतात. हे द्रव्य आणि ब जीवनसत्त्व शरीरात चरबी साठवण्यास प्रतिबंध करतात आणि परिणामी शरीरात चरबी साचून न राहिल्यामुळे पोट सुटत नाही. केळी हे पीक शरीरात चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास उपयुक्त ठरत असते. त्यातल्या त्यात अन्नपचन करणारे बॅक्टेरियाज केळीच्या सेवनाने वाढतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment