आपला ब्रेकफास्ट निःसत्त्व करू नका

breakfast
आपला ब्रेकफास्ट असो की लंच त्यामध्ये कमीत कमी उष्मांकाचे अन्नपदार्थ असले पाहिजेत असा आपला अट्टाहास असतो. अर्थात तो चुकीचा नाही कारण अधिक उष्मांकाचे खाद्यपदार्थ खाल्ले तर आपले वजन वाढू शकते आणि आपण तर वजनाच्या बाबतीत भलतेच सावध आहोत. या सावधपणाचा एक भाग म्हणून लो कॅलरी खाद्यपदार्थ खाण्याकडे आपला कल असतो. मात्र लो कॅलरीचा असा अट्टाहास करताना आपले दिवसातले पहिले खाणे निःसत्त्व आणि कमी पोषणमूल्यांचे होता कामा नये. याकडेही आपल्याला लक्ष दिले पाहिजे.

पहिली गोष्ट म्हणजे आपला ब्रेकफास्ट एक वाडगा भरूनच असावा. वाडगा भरून ओसंडून खाणे योग्य नव्हे. सकाळचा ब्रेकफास्ट भरपूर करावा असे सर्वसाधारणपणे सांगितले जात असले तरी त्यालाही मर्यादा असते. तेव्हा एक बाऊल म्हणजेच वाडगा ही मर्यादा पाळली पाहिजे. त्यातल्या काही खाद्यपदार्थांची चव साखर अधिक घातल्याने वाढणार असते आणि नकळतपणे आपला हात साखरेच्या पात्राकडे जातो. आपल्या नकळतच आपण एक चमचाभर साखर समोरच्या पदार्थात मिसळतो. एक चमचा साखरेने असे काय बिघडणार आहे असा विचार आपण करत असतो. मात्र अशी एकेक चमचा साखर मिळूनच आपले वजन वाढवत असते. ब्रेकफास्ट बरोबर फार तर दहा ग्रॅम साखर खाल्ली पाहिजे.

ब्रेकफास्टच्या डिशमध्ये कर्बोदके, प्रथिने आणि चरबी यांचा समतोल साधलेला असला पाहिजे. काही लोक वजन वाढू नये म्हणून तेलाच्या ऐवजी कर्बोदकांवर भर देतात. परंतु कर्बोदकेही जास्त खाल्ली तर वजन वाढण्यास कारणीभूत ठरत असतात. सकाळचा ब्रेकफास्ट फारच पोटभर करायचा असेल तर तो शिजवलेल्या अन्नाने पोटभर करण्यापेक्षा पोट भरण्यासाठी फळांवर भर दिला पाहिजे. फळांचा रस पिण्यापेक्षा फळे खाल्ली पाहिजेत आणि रस केला तरी त्यात साखर जरा जपूनच टाकली पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment