अजूनही पाकिस्तानात सिंग इज किंग

pakistan
पाकिस्तानात होणारी हिंदूंची हालअपेष्टा कुणापासूनही लपलेली नाही. हिंदूंना त्यांचे मूलभूत अधिकारही पाकिस्तानात दिले जात नाहीत. मात्र, तरीही कट्टरपंथी विचारधारा असलेल्या पाकिस्तानात एक असा हिंदू परिवार आहे, ज्याला पाकिस्तानी घाबरतात आणि हा परिवार मोठ्या ताठ मानेने येथे राहतो.

अनेक राजघराणी देशाची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानातच राहिली. अनेक रियासती तिकडेच राहिल्या. त्यातीलच एक म्हणजे उमरकोट रियासत. आता ही रियासत पाकिस्तानात असून करनी सिंह सोढा या रियासतचे प्रिंन्स आहेत. तिथे सोढा पूर्ण राजपूती थाटात राहतात. त्यांचा सोशल मिडियावरही मोठा जलवा आहे. ते त्यांच्या फोटोंना आणि मतांना खुलेपणाने मांडतात. प्रिन्स अनेक लक्झरी गाड्यांमधून तिथे फिरताना बघायला मिळतात. करनी सिंह जिथेही जातात तिथे त्यांच्या सोबत बंदूकधारी बॉडीगार्ड असतात.

करनी सिंह यांचे वडील हमीर सिंग हे सुद्धा तिकडे दमदार व्यक्तीमत्व म्हणूण लोकप्रिय असून या रजवाडी परिवाराचा पाकच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. पाकिस्तानातील मोठ्या मोठी हस्ती या परिवारासमोर थरकापते. त्याच्या कुणी रस्त्यातही आडवे येत नाही. हमीर सिंह यांचे वडील राणा चंद्र सिंह अमरकोट घराण्याशी संबंधीत आहेत. चंद्र सिंह सात वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्री राहिले आहेत. राणा चंद्र सिंह यांनी स्वतंत्रपणे पाकिस्तान हिंदू पार्टीची स्थापना केली होती. या पक्षाचा झेंडा केसरी रंगाचा होता. आणि त्यात ओम आणि त्रिशूल दाखवलेले आहे.

गेल्या वर्षी करनी सिंह मोठ्या धडाक्यात भारतातील राजस्थानमध्ये वरात घेऊन आले होते. जयपुरचे ठाकुर मानसिंग यांची मुलगी पद्मिनी हिच्यासोबत त्यांचा विवाह झाला. पाकिस्तानात कुणीही या लग्नाविरोधात बोलण्याची हिंमत केली नाही.

Leave a Comment